सोलापूर: पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी बुधवारी रंगभवन येथे ''जळगाव ते दिल्ली व्हाया मुंबई'' प्रकट मुलाखतीत एका थरारक न्यायालयीन प्रवासाचा अनुभव दिला. माधव देशपांडे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत, ''कायद्याचा डॉन'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲड. निकम यांनी कसाबची बिर्याणी हा माझाच फंडा असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी देशाप्रती कर्तव्य, दहशतवादी खटले आणि आयुष्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी वेगवान शैलीत उलगडल्या.
Leopard Attack: होत्या गाई म्हणून वाचल्या बाई ! 'टाकळी हाजी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला'; गायीच्या प्रतिहल्ल्याने वाचला जीव.. कसाबची बिर्याणी''कसाबने बिर्याणी मागितली'' ही बातमी प्रसिद्धी माध्यमांचा सूर बदलण्यासाठी हेतुपुरस्पर मी सोडली होती. जळगावहून मुंबईला आल्यानंतर कसाबने हातातील लाल धागा पाहून हे काय आहे विचारले. त्यावर मी हे माझ्या बहिणीने बांधले आहे जे तुझ्या नशिबात नाही असे सांगितले होते. न्यायालयात कसाब डोळे चोळत असताना प्रसारमाध्यमांनी ''कसाबने अश्रू ढाळले'' अशी बातमी दिवसभर चालवली. कसाबला पंजाबी येत होते व मला हिंदी, त्यामुळे मी त्याला बिर्याणी बद्दल विचारतात त्याने मान खाली घातली. न्यायाधीशांनी त्याला होकार समजला. त्यानंतर दिवसातील नकारात्मक बातम्यांचा सूर बदलण्यासाठी आणि कसाबचे क्रौर्य अधोरेखित करण्यासाठी मी ‘कसाबने मटन बिर्याणी मागितली’ हा ‘फंडा’ वापरला, अशी कबुली त्यांनी दिली.
२६/११ च्या कटाचा भाग सिद्ध करण्यासाठी त्यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांची केवळ दोन खटले दाखल करण्याची सूचना नाकारली. दहशतवाद्यांनी मास्टर जीपीएस फोडून टाकल्याने, भारतात तंत्रज्ञान उपलब्ध नसताना त्यांनी न्यूयॉर्क येथील एफबीआय अधिकाऱ्यांकडून कराची-मुंबईमधील डेटा मिळवला. त्यानंतर एफबीआयच्या अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांची टीका पत्करूनही प्रत्यक्ष साक्षीसाठी बोलावले. भारतातील प्रसिद्धी माध्यमे एफबीआय अधिकाऱ्यांवर टीका करतील या भीतीने एफबीआयच्या अधिकाऱ्यांकडून मला हवे ते वधून घेता आले. ज्यामुळे पाकिस्तानात कट रचल्याचे न्यायालयात सिद्ध करता आले, असेही त्यांनी सांगितले. नाशिक, जळगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या माधव सिंग भट्टीचा खटला योग्यरित्या चालवल्यानंतर, तत्कालीन पोलीस अधीक्षक दीपक जोग यांच्या सांगण्यावरून ते १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यात दाखल झाले.
पुढील वर्षी बायोपिकपुढच्या वर्षी ॲड. निकम यांच्या जीवनावर बायोपिक येत असून, अभिनेता राजकुमार राव त्यांची भूमिका साकारणार आहे. "मी स्वतःला कायद्याचा डॉन (बलवान) समजतो. असा ॲटिट्यूड असावा लागतो," असे सांगत, कर्तव्याशी प्रामाणिक राहिल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश त्यांनी दिला.
Farmer Women: बिबट्याच्या भितीने नवीन ‘संरक्षण कवच’; पिंपरखेड परिसरातील शेतकरी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे, अनोख्या उपायाची चर्चा.. संजय दत्तला शिक्षासंजय दत्तने एके-४७ बाळगल्याची माहिती पोलिसांना दिली असती, तर १९९३ चे बॉम्बस्फोट थांबवता आले असते, परंतु असे घडले नाही. खोटी गांधीगिरी करून पापे धुता येत नाहीत, असे सांगत त्यांनी प्रोबेशन ऑफ अफेंडर्स ॲक्टनुसार संजय दत्त याला माफीची तरतूद लागू होत नाही, हा आपला युक्तिवाद कसा ग्राह्य धरला गेला हे स्पष्ट केले.