Pregnancy Symptoms in Men: तुम्ही कधीतरी “सिम्पथी वेट” किंवा प्रेग्नन्सीमध्ये जोडीदाराचंही वजन वाढलंय असं ऐकलं असेलच. पण काही पुरुषांसाठी हा अनुभव फक्त वजनापुरता मर्यादित राहत नाही. तर जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नन्ट असते, तेव्हा तिच्या जोडीदारालाही प्रेग्नन्सी मधील काही लक्षणांसारखे परिणाम दिसू शकतात. यालाच कूवाड सिंड्रोम किंवा “सिम्पथेटिक प्रेग्नन्सी” असं म्हणतात. पण हो सिंड्रोम होण्यामागची कारणं काय आणि त्याचं लक्षणं कोणती ते जाणून घेऊया.
कूवाड सिंड्रोम म्हणजे काय? (Couvade Syndrome)कूवाड हा शब्द ब्रेटन भाषेतील “couver” या शब्दावरून आला असून याचा अर्थ अंडी घालणे असा होतो. या सिन्ड्रोममध्ये लक्षणं प्रेग्नन्सीसारखीच दिसतात, पण हा वैद्यकीय किंवा मानसिक स्थिती नसते.
मानवशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्राचीन काळातील काही धार्मिक प्रथांमध्ये पुरुष प्रेग्नन्सीमध्ये सहभागी झाल्याचे दाखवण्यासाठी प्रेग्नन्ट बायकोच्या लक्षणांचे अनुकरण करायचे. पण आजच्या आधुनिक जगात पुरुष भावनिकदृष्ट्या पालनपोषण आणि मुख्य प्रेग्नन्सीमध्ये सक्रिय आणइ खरोखरच सहभाग घेत आहेत. ते आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक वैद्यकीय तपासणीला जात आहेत आणि गर्भसंस्कारात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
Diabetes Causes Dementia: साखर फक्त शरीरालाच नाही, मेंदूलाही करते ‘डॅमेज’! तज्ज्ञांनी दिला डिमेंशियाच्या धोक्याचा इशारायामुळे आता वडील प्रेग्नन्सीमध्ये पूर्वीपेक्षा अधिक भावनिक सहभाग घेत आहेत. ज्यामुळे पुरुष आपल्या जोडीदाराच्या भावनिक आणि शारीरिक बदलांबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि म्हणूनच कूवाड सिंड्रोम किंवा सिम्पथेटिक प्रेग्नन्सी सध्या अधिक प्रमाणात दिसत आहे.
पुरुषांमध्ये दिसू शकणारी सामान्य लक्षणंमळमळणे किंवा उलट्या होणे
भूकेत बदल होणे
वजन वाढणे
पोट फुगल्यासारखे वाटणे (Bloating)
मूड स्विंग्स
झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल
पाठदुखी
अन्नाची विशेष क्रेविंग्स किंवा चीड येणे
हा सिंड्रोम पालक बनण्याच्या अनुभवामुळे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक बदलांमुळे होतो असं समजलं जातं. जेव्हा पुरुष आपल्या प्रेग्नन्ट जोडीदारासोबत प्रेग्नन्सीमध्ये भावनिकदृष्ट्या अधिक सहभागी होतात, तेव्हा ते अनपेक्षितपणे आपल्या जोडीदाराच्या लक्षणांचा अनुभव घेऊ शकतात.
या परिस्थितीत पुरुष खरोखरच प्रेग्नन्ट नसतात, पण ही लक्षणं मानसिक भावना, ताण आणि घरातील वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या हार्मोनल प्रतिक्रियांमुळे दिसतात. या प्रकारच्या अनुभवामुळे पुरुषांना जोडीदारासोबत अधिक जवळीक आणि सहानुभूती अनुभवता येते, आणि दोन्ही पालकांसाठी ही वेळ अधिक अर्थपूर्ण बनते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.