05783
वक्तृत्व, कथाकथनात यश चमकला
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा विद्यार्थी यश सावंतने वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत दुहेरी यश मिळावले. सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशने ‘बालपण हरवत चाललंय’ या विषयावर ओघवत्या, प्रभावी शैलीत भाषण सादर केले. पाचवी ते सातवी गटात त्याने तृतीय क्रमांकाची मानकरी ठरून रोख रक्कम, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह प्राप्त केले. बांदा नट वाचनालय बालवाचक कथाकथन स्पर्धेत यशने ‘संतांच्या जीवनातील प्रसंग’ या विषयावर प्रभावी आणि सुंदर कथाकथन सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला पुन्हा एकदा रोख पारितोषिक आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यशच्या दुहेरी यशाबद्दल अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर यांनी यशचे अभिनंदन केले.