पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँकेशी संबंधित कामांसाठी पॅनकार्डची आवश्यकता असते. अशातच आता केंद्र सरकारने आयकर प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्यासाठी पॅन 2.0 नावाची एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे आता आयकर विभागाला एखाद्या व्यक्तीकडे दोन किंवा जास्त पॅनकार्ड असतील तर त्याची माहिती समजणार आहे. कायद्यानुसार, एका व्यक्तीकडे दोन किंवा अधिक पॅन कार्ड असणे मोठा गुन्हा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अनेक लोक दोन किंवा जास्त पॅनकार्डच्या माध्यमातून फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. जर तुमच्याकडे चुकून दोन पॅन कार्ड असतील, तर तुम्हाला 10000 रुपयापर्यंत दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या नावावर डुप्लिकेट पॅन आहे की नाही हे तपासा आणि असेल ते ताबडतोब परत करा.
पॅन-2.0 मध्ये डुप्लिकेट पॅन कसे शोधते?जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर…
तुमच्या नावावर दोन (किंवा अधिक) पॅनकार्ड असतील, तर आयकर कायद्याच्या कलम 272 B अंतर्गत 10000 पर्यंत दंड होऊ शकतो. मात्र तुम्ही चुकून दुसरे पॅन कार्ड तयार केले असेल (जुने हरवले असेल), तर सरेंडर करताना तसे स्पष्टीकरण द्या, असे केल्यास तुमचा दंड माफ होऊ शकतो. मात्र इतर प्रकरणांमध्ये तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.