Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Saam TV November 23, 2025 06:45 PM
  • सेव्हन हिल फ्लायओव्हरवर तीन वाहनांची भीषण टक्कर

  • अचानक ब्रेक लावल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

  • अपघातात ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

  • अपघातानंतर वाहतूक व्यवस्थेवर आणि वाहनधारकांवर गंभीर प्रश्न

माधव सावरगावे, संभाजीनगर

पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची बातमी ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलावर कार चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात एका ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी एक कारचालक हायकोर्टाकडून आकाशवाणीच्या दिशेने सुसाट वेगात जात होता. सेव्हनहिल उड्डाणपूल चढल्यावर पुलाच्या मधोमध त्याने अचानक ब्रेक दाबले. त्याच वेळेला अंड्याची वाहतूक करणारी लोडिंग रिक्षा त्या कारच्या मागे होती. समोरील कार अचानक थांबल्याने रिक्षाचालकाने ब्रेक दाबले व ती जागेवर थांबली.

Pune Viral Video : "मी पोलिसांचा मुलगा" पुण्यात तरुणाचा भररस्त्यात गोंधळ, VIDEO व्हायरल

मागून असलेली कार रिक्षावर धाडकन आदळली. त्यानंतर पाठोपाठ असलेली कार देखील पहिल्या कारवर आदळली. या भीषण अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला. अशातच शेवटच्या कारमध्ये समोरच्या सिटवर बसलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी मृत्यूबाबत कोणतीही माहिती प्राप्त नसल्याचे सांगितले.

Maharashtra Politics : घराणेशाहीला ब्रेक! अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात, भाजपाचा धडाकेबाज निर्णय

दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलावरील देखील असाच अपघात झाला होता. त्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. त्यात एक संपूर्ण कुटुंब आणि एका चिमुकलीचा समावेश होता. अपघाताचे वाढते प्रमाण नेमकं कोणामुळे? यासाठी कोणाला धारेवर धरायचं? सरकार की बेजबाबदार चालक? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.