सांगलीची कन्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांचा शाही विवाह सोहळा आज 23 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. अनेक दिग्गजांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली आहे. दरम्यान, स्मृतीचा विवाहसोहळा पार पडत असलेल्या फार्म हाऊसवर अचानक रुग्णवाहिका पोहोचली आहे. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. आता नेमकं कुणाची प्रकृती खालावली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अचानक रुग्णवाहिका फार्महाऊसवर
23 नोव्हेंबर रविवारी स्मृती व पलाश यांचा विवाह संपन्न होणार आहे. दुपारी 3.30 वाजता विवाह मुहूर्त आहे. हा लग्न सोहळा सांगलीमधील वठेपिरांन रोड येथील मानधना फार्म हाऊस पार पडत आहे. त्यासाठी संपूर्ण फार्म हाऊस सजवण्यात आले आहे. परवा हळद, काल मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला. आज सकाळी अचानक फार्म हाऊसवर रुग्णवाहिका पोहोचली. लग्न समारंभच्या ठिकाणाहून एकाला उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. मेडिकल इमर्जन्सी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र नेमका काय प्रकार घडला याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाही. तसेच कोणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही.
येणार VVIP पाहुणे
स्मृती मानधनाच्या विवाह सोहळ्यासाठी क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना निमंत्रण करण्यात आले आहे. या लग्न सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट टीमच्या खेळाडू अधीच दाखल झाल्या आहेत. सचिन तेंडुलकर,वीराट कोहली, रोहित शर्मा,सौरभ गांगुली,व्ही व्ही लक्ष्मण, सोनू निगम,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीने बंदोबस्ताची तयारी देखील करण्यात येत आहे,मात्र या बाबतीत अत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे.
डॉग स्कॉडही हजर
स्मृती मानधनाच्या लग्नाआधीचे विधी सुरु असताना अचानक फार्म हाऊसव डॉगस्कॉडही पोहोचले होते. पोलीस दलाच्या वतीने बॉम्ब शोधक डॉग स्कॉड पथक पाठवण्यात आले होते. अनेक मान्यवर या शाही विवाह सोहळ्यासाठी येणार असल्यामुळे या डॉग्सच्या माध्यमातून विवाह स्थळाची संपूर्ण तपासणी आणि पाहणी करण्यात आली होती. पण अचानक पोलीस आणि डॉग स्कॉड आल्यामुळे सर्वजण सुरुवातीला घाबरले. नंतर केवळ तपासाचा भाग असल्यामुळे पुन्हा सर्वजण आनंदाने मजामस्ती करु लागले होते. आता मेडीकल एमर्जन्सीमुळे रुग्णवाहिका फार्महाऊसवर पोहोचली होती.