16000 रुपयांची SIP केली तर केव्हा बनाल करोडपती?, हा पर्यायही आणखी चांगला
Tv9 Marathi December 08, 2025 01:45 AM

देशात आता वित्तीय जागरुकता वाढली असून लोक बचतीला प्राधान्य देत आहेत. खास करुन म्युच्युअल फंड्समध्ये सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे SIP हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा लोकप्रिय पर्याय बनला आहे. एसआयपीद्वारे लहान-लहान मासिक गुंतवणूकीतून दीर्घकाळात मोठा फंड तयार करता येतो. यात तर १६ हजार रुपयांच्या मासिक एसआयपीतून १ कोटी रुपयांचा फंड बनवण्यासाठी किती वेळ लागतो ते पाहूयात.

इतक्या वर्षात होणार एक कोटी फंड

जर एखादा व्यक्ती दर महिन्याला १६,००० रुपयांचा एसआयपी करत असेल तर त्याला सरासरी १२ टक्के वार्षिक रिटर्न मिळतो. तर त्याला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी सुमारे १७ वर्षे लागू शकतात. या अवधीत गुंतवणूकदारांची एकूण गुंतवणूक ३२.६४ लाख रुपये होईल. त्यात अंदाजे रिटर्न सुमारे ७४.२२ लाख पोहचू शकते. याप्रकारे मॅच्युरिटीचा एकूण फंड १.०६ कोटी रुपये होऊ शकतो. हे आकडे अंदाजे आहेत. वास्तविक रिटर्न मार्केटच्या चालीनुसार घटू किंवा वाढू शकते.

SIP का होत आहे सामान्यांचा गुंतवणूक पर्याय

SIP ची सर्वात मोठी खासियत ही आहे की यात गुंतवणूकदाराला एक मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. तो काही अंतराने छोटी-छोटी रक्कम गुंतवू शकतो. मार्केटमध्ये घसरणीच्यावेळी कमी किंमतीवर जास्त युनिट्स मिळतात. तर तेजी असताना गुंतवणूकीची किंमत वेगाने वाढते. या संपूर्ण प्रक्रियेत कंपाऊंडींग दीर्घकाळात गुंतवणूकीला अनेक पटीने वाढवते. हेच कारण आहे की इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये SIP ला दीर्घकाळात सर्वात प्रभावशील साधन मानले गेले आहे.

स्टेप-अप SIP ने लक्ष्य आणखीन वेगात

जर गुंतवणूकदाराने दरवर्षी त्याच्या SIP रकमेत १० टक्के वाढ केली तर ज्याला स्टेप-अप SIP म्हटले जाते, तर १ कोटी रुपयांचे लक्ष्य आणखी वेगाने साध्य केले जाऊ शकते. १६,००० रुपयांच्या सुरुवातीच्या मासिक एसआयपीमध्ये दर वर्षी १० टक्के वाढ केल्यानंतर १२ टक्के अंदाजित रिटर्नचा रेटने हे लक्ष्य सुमारे १४ वर्षांत पूर्ण होऊ शकते. म्हणजे केवळ गुंतवणूक वाढवण्याच्या रितीने सुमारे ४ ते ५ वर्षांचा वेळ वाचवता येतो.

जोखीम आणि सावधानताही गरजेची

हे समजणे ही गरजेचे आहे की SIP मार्केटशी जोडलेली असते. यात जोखीम देखील असते. रिटर्नची काही गॅरंटी नसते. मार्केटमधील चढ-उतारामुळे वास्तविक रिटर्न अंदाजापेक्षा जास्त किंवा कमीही होऊ शकते. याशिवाय टॅक्स देखली गुंतवणूकीच्या एकूण रिटर्नला प्रभावित करतो. यामुळे गुंतवणूकीच्या आधी आपले उत्पन्न, खर्च आणि जोखीम सहन करण्याची क्षमता आणि वित्तीय लक्ष्य याचे आकलन करणे गरजेचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.