‘महामानवाचे फार मोठे उपकार’
नेरूळ (बातमीदार) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता आदर्श राज्यघटना भारतीयांना दिली. या महामानवाचे फार मोठे उपकार आहेत. लोकशाहीत मत देण्याचा हक्क देऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायव्यवस्था बळकट केल्याचे रतन मांडवे यांनी सांगितले. नेरूळ सेक्टर आठ येथील एल मार्केटमध्ये बुद्धिस्ट सोशल फोरमच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिवसेना माजी नगरसेवक रतन मांडवे, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले, बेलापूर विधानसभा सरचिटणीस मारुतीराव चौधरी, वंचित बहुजन आघाडी, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.