पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना अपघात
esakal December 08, 2025 05:45 PM

केशवराव जेधे चौक, स्वारगेट :
स्वारगेट बस स्थानक, मेट्रो, पीएमपी बस स्थानकामुळे या चौकात वाहतुकीची सतत वर्दळ असते. या भागात रिक्षांची संख्या अधिक असून, काही रिक्षाचालक रस्त्याच्या मध्यभागी थांबतात. पादचारी मार्गावर अतिक्रमण, भरधाव आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे या चौकातील वाहतूक धोकादायक झाली आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अपघात होत आहेत.

उपाययोजना :
- पीएमपी बसथांबा मागे सरकवून, बस आणि रिक्षाथांबा निश्चित करणे
- वाहतूक पोलिसांकडून रिक्षांच्या अनधिकृत थांब्यांवर कारवाई
- नो पार्किंग झोन निर्माण करून नियमित कारवाई करावी
- वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय अपेक्षित

स्वारगेटकडे येताना बस आणि पादचाऱ्यांच्या गोंधळामुळे एका चौकात तीन-तीन सिग्नलला अडकून पडावे लागते. रस्त्याच्या मध्यभागी बस थांबल्यामुळे जास्त त्रास होतो.
- रोहन सुरवसे-पाटील, वाहनचालक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.