रस्त्यांच्या दुरुस्तीवरून कलगीतुरा
दिघ्यामध्ये शिंदे गट, भाजपमध्ये फलकबाजी
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः दिघा रेल्वे स्थानकापासून बंदुमाधवनगरपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. यावरून शिंदे सेनेचे विजय चौगुले, भाजपचे नवीन गवते यांनी फलकबाजीतून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून स्वखर्चाने रस्त्यांची साफसफाई केली असून दिशाभूल करणाऱ्यांपासून सावधान राहण्याचे फलक दिघ्यामध्ये झळकले आहेत. तर भाजपचे नवीन गवते यांनीदेखील दिघा गाव रेल्वे स्थानकापासून बिंदुमाधवनगरपर्यंत रस्ता, पथदिव्यांची सोय करून झाडाझुडपांच्या फांद्या छाटण्यात आल्याच्या कामांचा फलक लावून जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे दिघ्यामध्ये शिंदे गटाचे विजय चौगुले विरुद्ध भाजपचे नवीन गवते यांच्यात निवडणुकीपूर्वीच श्रेयवाद रंगला आहे.
-------------------------
अंतर्गत कुरबुरी
नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदे यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोरच प्रतिस्पर्धी म्हणून लढणार आहेत. त्याचाच प्रत्यय दिघ्यामध्ये दिसत आहे. पालिकेची प्रभागरचना व आरक्षण सोडत झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रभाग निश्चित केले आहेत. त्यामुळे महायुतीत अंतर्गत कुरबुरी असल्याची चर्चा आहे.