दापोली-रविराज हांगे यांची निवड
esakal December 10, 2025 03:45 AM

rat9p1.jpg-
O09475
रवीराज हांगे

राज्य खो-खो स्पर्धेसाठी
रवीराज हांगे यांची निवड
दापोली, ता. ९ : राज्यशासनातर्फे चालू शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शिक्षक, अधिकारी यांच्या कलागुणांना संधी देत क्रीडास्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यात दापोली तालुक्यातील पालगड बौद्धवाडी शाळेतील शिक्षक रवीराज हांगे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धेचे नियोजन आणि प्रशिक्षण कार्यक्रमावेळी पंचायत समिती दापोली शिक्षण विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हांगे यांचा विशेष गौरव करण्यात आला. या वेळी तालुक्यातील तज्ञ शिक्षकांनी उपस्थितांना विविध खेळांबद्दल मार्गदर्शन केले. व्यासपिठावर क्रीडा नोडल अधिकारी, बळीराम राठोड, विस्तार अधिकारी, नजीर वलेले, मेघा पवार, सुधाकर गायकवाड, केंद्रप्रमुख सुनील कारखेले आदी मान्यवर उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.