AI Traffic Signal Failed Nagpur : हिवाळी अधिवेशनासाठी शहरात वर्दळीमुळे विधानभवन मार्गाने जाण्याच्या मार्गात वाहतूक विभागाने बदल केले. दुसरीकडे कुठेही गर्दी होऊ नये यासाठी ‘एआय सर्व्हिलन्स सिस्टीम’ लावण्यात आली.
मात्र, पहिल्याच दिवशी शहरातील सीताबर्डीसह, सिव्हील लाईन्स आणि धंतोली परिसरात वाहनांच्या गर्दीने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे ‘एआय’ सर्व्हिलन्स’ सपशेल नापास ठरल्याची चर्चा आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चार मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली. मोर्चे आणि सुरक्षेच्या दिशेने शहर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला आहे. या बंदोबस्तात वाहतूक शाखेवर वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी आहे.
वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांचे ‘एआय’ नापासत्यात व्हीआयपीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून अधिवेशनाच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कुठेही गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांकडून यंदा प्रथमच ‘एआय मॉनेटरिंग सिस्टिम’ची मदत घेण्यात येत आहे.
मात्र, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सिव्हील लाईन्स परिसरात जवळपास दोन किलोमीटर वाहनांचा रांगा लागल्याचे दिसून आले. महाराजबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय, सीताबर्डी चौक आणि धंतोली चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. त्यातून नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी ! 'वाहनांच्या रांगाच-रांगा'; काँक्रिटीकरणाच्या कामाचा वाहनधारकांना त्रास.. रुग्णवाहिका अडकली कोंडीतमहाराजबाग ते जिल्हाधिकारी चौकादरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडीमध्ये ॲम्बुलन्स अडकल्याचे दिसून आले. यावेळी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.