Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी आज एकाच बैठकीत, काय आहे कारण?
esakal December 10, 2025 11:45 AM
Sangli News : अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे सोमवारी लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कार्यक्रम

सांगली : ‘येथील प्रभाग क्रमांक ९ मध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे,’ अशी माहिती पुतळा समितीच्या वतीने देण्यात आली. प्रभाग क्रमांक नऊमध्ये अहिल्यादेवी होळकर चौकात अहिल्यादेवींचा सुमारे दीड कोटी रुपये खर्चून अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. सुमारे चार टन वजनाचा २१ फूट उंचीचा व अश्वारूढ असलेला हा अहिल्यादेवींचा देशातील एकमेव पुतळा आहे. पुतळ्याचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार, नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुतळा समितीची आज बैठक झाली.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी आज एकाच बैठकीत

नवी दिल्ली : देशाचे मुख्य माहिती आयुक्त तसेच केंद्रीय माहिती आयोगातील अन्य पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १०) बैठक आहे. आयुक्त निवडीसाठीच्या तीन सदस्यांच्या समितीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठीच्या समितीमधून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना सरकारने वगळल्याचा आरोप गांधी यांनी निवडणूक सुधारणा विषयावरील चर्चेत सहभाग घेताना केला होता. या पार्श्वभूमीवर मोदी आणि गांधी हे आमनेसामने येत आहेत. माहिती अधिकार कायद्यातील कलम १२ (३) नुसार देशाच्या मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक करायच्या समितीचे पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. समितीच्या दोन अन्य सदस्यांमध्ये विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी शिफारस केलेला एक केंद्रीय मंत्री यांचा समावेश असतो.

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जयअनमोल यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Latest Marathi Live Updates 10 December 2025 : सुमारे २२८ कोटी रुपयांच्या बॅंक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जयअनमोल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच देशाचे नागरिक नसतानादेखील मतदार यादीत नाव समाविष्ट झाल्याच्या प्रकरणात राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. देशाचे मुख्य माहिती आयुक्त तसेच केंद्रीय माहिती आयोगातील अन्य पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १०) बैठक आहे. राज्यातील अनेक महानगरपालिकांमधील प्रारुप मतदार याद्यांवरील हरकतींची सुनावणी बाकी असल्याने आता प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १० ऐवजी १५ डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील तिन्ही टप्पे पाच दिवसांनी पुढे गेले आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.