Balochistan Freedom Fighter: सध्या सगळीकडं धुरंधर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. भारतीय चित्रपटाचा चाहता वर्ग पार इराण, रशिया तर पूर्वेत जपानपर्यंत आहे. नाना पाटेकर यांचा तिरंगा चित्रपट आठवतोय का? तर या चित्रपटाने बलुचिस्तानमध्ये धुमाकूळ घातला होता. त्याचं कारणं तसंच होतं. “मराठा मरता है या मारता है” हा डायलॉग इतका गाजला की, पाकिस्तानच्या अनेक चित्रपटगृहं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. विशेषतः बलुचिस्तानमध्ये थिएटरमध्ये हा डायलॉग वारंवार दाखवण्यात आला. या एका वाक्यासाठी थिएटर बुक झाली. कारण बलुचिस्तानमध्ये बुगटी मराठा हे तिथल्या संस्कृतीचे भाग झाले आहेत. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठा कैद्यांना बंदी बनवून तिथे आणण्यात आले. ते तिथल्या संस्कृतीचा भाग झाले. स्वातंत्र्य, स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांपैकी बलूच एक मानले जातात. गेल्या 8 दशकांपासून ते त्यांच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानसोबत लढत आहेत. त्यांच्या अनेक नेत्यांनी आणि तरुणांनी त्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे. पण भारतीय चित्रपट धुरंधरमध्ये त्यांचे चुकीचे व्यक्तिमत्व रेखाटल्याने बलूच भारतावर नाराज झाले आहेत. एका सच्चा मित्राला मदतीचा हात न देता असं बदनाम करणं त्यांना रुचलेले नाही. कोण आहेत...