09498
कृषी उत्पन्न बाजार समिती
उपसभापतिपदी पाटकर
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ९ ः सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी परुळे येथील प्रसाद पाटकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक मर्भळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी प्रमुख उपस्थित होते. समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात संचालक मंडळातील अजय आकेरकर, सदानंद सर्वेकर, सुजाता देसाई, मंगेश ब्रह्मदंडे, मकरंद जोशी, आनंद ठाकूर, प्रदीप मांजरेकर, दिलीप तवटे, अशोक पराडकर, किरण रावले, बाजार समितीचे आर्किटेक्ट योगेश सावंत आदी उपस्थित होते. निवड जाहीर झाल्यानंतर पाटकर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत शेतकरीहिताचे निर्णय, पारदर्शकता आणि काटेकोर कारभाराला प्राधान्य देण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला. यावेळी समितीतील सर्व सदस्यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.