साहित्य-
हिरवी मिरची-२५० ग्रॅम
मोहरीची डाळ -४ मोठे चमचे
शेंगदाणा तेल किंवा मोहरीचे तेल -४ मोठे चमचे
लिंबाचा रस- ४ मोठे चमचे
हळद - १/२ छोटा चमचा
हिंग -१/४ छोटा चमचा
मीठ- २ छोटे चमचे
ALSO READ: लिंबू-आल्याचे लोणचे रेसिपी
कृती-
सर्वात आधी हिरवी मिरची स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यांना कपड्याने पूर्णपणे पुसून घ्या. आता मिरच्यांची देठं काढून टाका. प्रत्येक मिरचीला उभी चिर द्या. अश्या प्रकारे चिरून घ्या. आता मसाला तयार करायचा. एका मोठ्या वाडग्यात मोहरीची डाळ, हळद आणि मीठ एकत्र करा. या मिश्रणात लिंबाचा रस घाला आणि चांगले मिक्स करा. आता एका छोट्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर गॅस बंद करा. तेलाचे तापमान थोडे कमी झाल्यावर त्यात हिंग घाला. ही गरम तेलाची फोडणी लगेच मोहरीच्या डाळीच्या मसाल्याच्या मिश्रणात ओता आणि मिक्स करा. आता चिरलेल्या हिरव्या मिरच्या फोडणी दिलेल्या मसाल्याच्या मिश्रणात घाला. मिरच्यांना मसाला व्यवस्थित लागेपर्यंत हळूवारपणे मिक्स करा. चवीनुसार मीठ किंवा लिंबाचा रस कमी-जास्त करू शकता. तसेच लोणचे एका स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे लोणचे तुम्ही लगेच खाऊ शकता. व चव आणखी वाढवण्यासाठी २ दिवस बरणीतील लोणचे दिवसातून एकदा चमच्याने ढवळून घ्या.
आवश्यक टिप्स
*लोणचे बनवताना आणि साठवताना कोणत्याही साहित्यावर किंवा बरणीत पाण्याचा अंश नसावा.
*लोणचे जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही तेलाचे प्रमाण थोडे वाढवू शकता.
*मिरची चिरताना हातांना तेल लावून घ्या किंवा ग्लोव्ह्ज वापरा, जेणेकरून मिरचीचा तिखटपणा हातांना लागणार नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: हिवाळ्यात तेल न घालता बनवा हिरवी मिरची-गाजराचे लोणचे रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: भरलेले लाल मिरचीचे लोणचे रेसिपी