आयपीएल 2026 मिनी लिलावासाठी दहाही फ्रेंचायझी सज्ज झाल्या आहेत. 2025 मेगा लिलावात संघ बांधला होता. मात्र त्यातील उणीवा दूर करण्याची वेळ आता आली आहे. त्या दृष्टीने फ्रेंचायझींनी काही खेळाडूंना रिलीज केलं आहे. काही खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर ट्रेड विंडोच्या माध्यमातून रिकामी जागाही भरून काढली आहे. आता उर्वरित संघाच्या बांधणीसाठी फ्रेंचायझी मिनी लिलावात बोली लावणार आहे. 16 डिसेंबर रोजी अबू धाबीत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावासाठी 1355 खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. पण त्यापैकी आता फक्त 350 खेळाडूंवरच बोली लागणार आहे. कारण बीसीसीआयने फ्रेंचायझींशी सल्लामसलत करत त्यापैकी 1005 जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता मिनी लिलावासाठी 350 खेळाडूंची अंतिम यादी तयार आहे. बीसीसीआयने 8 डिसेंबरच्या रात्री आयपीएल फ्रँचायझींना लिलावाची माहिती ईमेलद्वारे दिली. 350 खेळाडूंसाठी 16 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता अबू धाबी येथे बोली लागेल.
350 जणांच्या यादीत 35 खेळाडू असे आहेत की त्यांनी शेवटच्या काही मिनिटांमध्ये या यादीत एन्ट्री घेतली आहे. म्हणजे त्या लिलाव प्रक्रियेचा भाव नव्हते. या नव्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण अफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटन डिकॉक याचंही नाव आहे. डीकॉकसह या 35 खेळाडूंना फ्रँचायझींच्या शिफारशींवरून अंतिम लिलाव यादीत समाविष्ट केल्याचं बोललं जात आहे. क्विंटन डीकॉकने आयपीएल 2026 च्या लिलावासाठी त्याची मूळ किंमत 50 टक्क्यांनी कमी करत 1 कोटी रुपये ठेवली आहे. ट्रेविन मॅथ्यू, बिनुरा फर्नांडो, कुसल परेरा आणि डुनिथ वेलागे सारख्या श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंची नावे देखील शेवटच्या वेळी यादीत समाविष्ट केली आहेत.
आयपीएल 2026 च्या लिलावासाठी खेळाडूंची संपूर्ण यादी कॅप्ड खेळाडू :अनकॅप्ड खेळाडू: