Katrina Kaif-Vicky Kaushal : "अपुरी झोप अन्..."; आई झाल्यानंतर कतरिनाची पहिली झलक, विकीनं शेअर केला खास फोटो
Saam TV December 10, 2025 12:45 PM

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत.

कतरिना-विकी अलिकडेच आई-बाबा झाले आहेत.

आई झाल्यानंतर कतरिनाची पहिली झलक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचे पावर कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल अलिकडेच आई-बाबा झाले आहेत. कतरिनाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हे कपल प्रेग्नन्सीमुळे खूप काळ चर्चेत होते. बाळाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच कतरिना कैफची झलक पाहायला मिळाली आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला नुकतीच 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्त विकीने कतरिनासोबतचा खास फोटो शेअर केला आहे. ज्याला त्याने हटके कॅप्शन दिलं आहे. विकी कौशलने कतरिनाला मिठी मारून एक छान सेल्फी क्लिक केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आम्ही आजचा दिवस साजरा करत आहोत... आनंदी, कृतज्ञ आणि झोपेची कमतरता... लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... " (Celebrating today...blissful, grateful and sleep deprived. Happy 4 to us...)

विकी कौशलच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच फोटोंमध्ये कतरिना कैफची झोप न झालेली दिसत आहे. बाळाच्या आगमनाने विकी आणि कतरिना चांगलेच व्यस्त झालेले पाहायला मिळत आहेत. आई झाल्यानंतर कतरिनाची ही पहिली झलक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

9 डिसेंबर 2021 मध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 4 वर्षांनी त्यांनी बाळाला जन्म दिला. अद्याप कतरिना-विकीने लेकाचे नाव सांगितले नाही. चाहते नावाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लेकाचा 7 नोव्हेंबरला जन्म झाला. पालक झाल्यापासून कतरिना-विकी पुरेशी झोप मिळालेली नाही. फोटोमध्ये कतरिनाचा नो मेकअप लूक दिसत आहे.

Marathi Show : लहानग्यांसाठी सुरू होणार नवीन शो; 'स्टार प्रवाह'नं शेअर केला VIDEO, तारीख काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.