मूलांक १ (कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ तारखेला जन्मलेले)
१० डिसेंबरचा दिवस तुमच्या गरजा पूर्ण करण्यावर आणि स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी आवश्यक पाठिंबा मागा आणि वैयक्तिक वाढीसाठी गुंतवणूक करा. विश्रांतीसाठी तुम्हाला वेळ देण्याची गरज आहे.
मूलांक २ (कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला जन्मलेले)
कौटुंबिक समस्या तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकतात, त्यामुळे सामंजस्याने काम करा. जीवनात आनंद मिळवण्यासाठी छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
मूलांक ३ (कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेले)
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. नियोजनानुसार प्रगती होईल आणि करिअर व व्यवसायावर तुमचा फोकस वाढेल. अपेक्षित लाभ मिळतील आणि तुमचा impact टिकून राहील.
मूलांक ४ (कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२, ३१ तारखेला जन्मलेले)
भावनिकतेमध्ये वाहून जाऊ नका. दीर्घकालीन स्थिरता आणि गोलवर फोकस करण्याची ही योग्य वेळ आहे. आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.
NUMEROLOGY JOBS : तुमची जन्मतारीखच सांगते, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात मिळेल झटपट यश..मूलांकाप्रमाणे जाणून घ्या बेस्ट नोकरीबद्दलमूलांक ५ (कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्मलेले)
आजचा दिवस स्वातंत्र्य, बदल आणि अनपेक्षित घटनांचा आहे. प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी महत्त्वाचे शिकायला मिळेल म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, इतरांचे सल्ले घेऊ नका. घाईत निर्णय घेणे टाळा.
मूलांक ६ (कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेले)
आरोग्याच्या कारणास्तव तुमच्या प्लॅनमध्ये बदल होऊ शकतो. कला, संस्कृती आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हा एक बेस्ट दिवस आहे. इतरांशी सहज संवाद साधाल.
मूलांक ७ (कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला जन्मलेले)
१० डिसेंबरचा दिवस स्वतः वर दृढ विश्वास ठेवा. ध्यान किंवा आत्मनिरीक्षणासाठी वेळ काढा. रचनात्मकता आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करा.
मूलांक ८ (कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेले)
१० डिसेंबरला तुम्ही कामात खूप व्यस्त राहणार आहात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि मोठे निर्णय घेणे टाळा. दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक जोखीम टाळा.
Year End : गुगलवर रात्रीच्या वेळेस सर्वांत जास्त काय सर्च झाले? 2025 च्या धक्कादायक रेकॉर्डने जग हादरलंमूलांक ९ (कोणत्याही महिन्याच्या ९, १८, २७ तारखेला जन्मलेले)
हा महिना आणि वर्ष (२०२५ हे जागतिक वर्ष ९ आहे) पूर्णत्व आणि बदलाचे प्रतीक आहे. जुन्या गोष्टी सोडून द्या आणि नवीन संधींसाठी जागा तयार करा. आर्थिक बाबींमध्ये सावध राहा
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.