Ajit Pawar: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ऑपरेशन टायगर चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यामध्ये झालेल्या भेटीनंतर या चर्चांना उधाण आहे. मात्र, या चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी भाजपने दोन नेते हाताशी धरले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Dhananjay Munde: "...अन् धनंजय मुंडेंवरच डाव उलटला"; भाजपच्या आमदरानं डागली तोफगेल्या काही दिवसांपासून भाजप ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी उदय सामंत यांचा वापर करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केला असून त्यासाठी दोन बड्या नेत्यांना गळाला लावल्या असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
Property tax hike Ahilyanagar : बोगस सर्वेक्षण, 15 कोटींचे बिल थांबवा; ...तर आर्थिक शाखेकडे गुन्हा नोंदवणार, काँग्रेसच्या इशाऱ्यानं वातावरण तापलं!पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केलास महायुतीमधील मित्रपक्ष एकत्रित निवडणूक लढतील असा शक्यता कमी आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याच धोरण भाजपचा आहे.
Amit Shah News : प्रियांका गांधींचा मोदींना करारा जवाब; अमित शहांनी राज्यसभेत कात्रीत पकडलं, ‘त्या’ खासदारांची यादी तयार...मात्र, या फेरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या तिन्ही पक्षांची युती होईल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच महत्त्व फक्त मुंबई महापालिका निवडणुकीत होईपर्यंतच भाजपसाठी असणार आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंतर भाजप आपल्या दोन्ही मित्र पक्षांना वाऱ्यावर सोडेल. त्यामुळे 2019 पूर्वी भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशा निवडणुका आपल्याला पाहायला मिळतील असं रोहित पवार म्हणाले.
काँग्रेसने 'वंदे मातरम्'चे तुकडे केल्याचा PM मोदींचा आरोप, नेमका खरा इतिहास काय?रोहित पवार पुढे म्हणाले, मला वाटत नाही ऑपरेशन टायगर सारख्या गोष्टी चालतील मात्र ऑपरेशन लोटस सुरू आहे. कारण भाजपकडे अमाप पैसा आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला. आता गेले दोन वर्षापासून भाजप ऑपरेशन लोटस राबवत असून त्यांच्याकडे असलेल्या पैशातून आमदार आणि खासदार फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. भाजपचा मुख्य फोकस हा अजित पवार यांचा पक्ष असून दादांच्या पक्षातील दोन नेत्यांना हाताशी धरून पक्ष फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.