बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. मुंबईतील निवासस्थानी वयाच्या 89 व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधानानेकुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, चाहते सर्वांनाच धक्का बसला. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी एका शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे बॉलवूडमधले सर्व कलाकार धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यास पोहोचले. मात्र हेमा मालिनी (Hema Malini) आणि त्यांच्या मुली ईशा व आहना या दूर होत्या. त्यांनी त्यावेळी राहत्या घरी पूजा ठेवली होती. जिथे ईशा देओलचा पूर्व पती भरत तख्तानी देखील हजर होता.
तर आता हेमा मालिनी यांनी दिल्लीत धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभेचं आयोजन केलं आहे, ज्याच्या निमंत्रण पत्रिकेवर ईशा देओल (Esha Deo) हिच्यासोबत पूर्व पती भरत तख्तानी यांचही नावह लिहीलं आहे. विभक्त झाल्यानंतर आजही दोघं एकमेकांच्या निकट आहेत, हे स्पष्ट होतंय. त्यामुळे दिल्लीतील प्रार्था सभेत एकत्र येऊन ईशा आणि भरत हे धर्मेंद्र यांची अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकतात.
दिल्लीत प्रार्थना सभेचं आयोजन
हेमा मालिनी, ईशा देओल आणि आहना देओल यांनी गुरूवार, 11 डिसेंबर रोजी दिल्लीतील जनपथ येथील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात प्रार्थना सभा आयोजित केली आहे. दुपारी 4 ते 6 यावेळेत ही प्रार्थना सभा होईल. यावेळी कठीण काळात साथ देण्यासाठी, सोबत करण्यासाठी ईशा हिचा पूर्व पती भरत तख्तानी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
भरत देणार ईशाची साथ
या प्रार्थना सभेत ईशा देओलचा पूर्व पती भरत तख्तानी याचेही नाव समाविष्ट आहे. ईशा, अहाना आणि हेमा मालिनी यांच्यासह भरतचे नाव निमंत्रण पत्रिकेत समाविष्ट आहे. तसेच अहानाचा पती वैभव वोहरा याच्या नावाचा देखील यात समावेश आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने हेमा मालिनी आणि ईशा दुःखी आहेत. या कठीण काळात भरत त्यांना साथ देत आहे. त्याने रुग्णालयात धर्मेंद्रची भेटही घेतली.
ईशा आणि भरत हे 2024 मध्ये परस्पर सहमतीने विभक्त झाले. 2012 साली त्यांचं थाटामाटात लग् झालं, मात्रप लग्नाच्या 12 वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना राध्या आणि मिराया, या दोन मुलीही आहेत. त्या ईशासोबत राहतात. ईशा-बरत यांच्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता. मात्र आता धर्मेद्र यांच्या जाण्यानंतर कठीण काळात भरत हा ईशाला सपोर्ट करताना दिसत आहे.