अमेरिकेची ज्वारी आणि सोयाबीन येणार भारताच्या बाजारपेठेत? व्यापार कराराबाबत अत्यंत मोठी अपडेट, थेट..
GH News December 10, 2025 07:11 PM

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आहेत. भारत फक्त आम्हाला त्यांच्या वस्तू निर्यात करतो. मात्र, अमेरिकेकडून काहीच खरेदी करत नाही, अशी ओरड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांची आहे. सध्या भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही गोष्टी भारतीय बाजारपेठेत विकण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव आणत आहे. मात्र, भारतीय शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच भारत अमेरिकेसोबत करार करत आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर व्यापार चर्चा पूर्णपणे बंद होती. भारत आम्हाला प्रतिसाद देत नसल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आज भारत आणि अमेरिकेत महत्वपूर्ण व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. भारत-अमेरिका कराराबद्दल अमेरिकेने मोठा दावा केला आहे.

आयएएनएसच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या व्यापार चर्चेत आतापर्यंतचा सर्वोत्तम पर्याय दिला आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये अमेरिकन शेतकऱ्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे. ज्वारी आणि सोयाबीनसारख्या पिकांसाठी बाजारपेठ उघडण्याबाबत चर्चा सुरू आहे. याला भारत किती प्रतिसाद देतो हे पाहण्यासारखे ठरेल. कारण भारतीय शेतकरी मोठ्या संख्येने ज्वारी आणि सोयाबीनचे पिक घेतात.

अमेरिकेचे एक व्यापारी पथक सध्या नवी दिल्लीत आहे आणि काही कृषी मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. दोन्ही बाजूंनी व्यापार करार व्हावेत याकरिता प्रयत्न केली जात आहेत. अमेरिकेच्या मागून रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर आले आणि काही महत्वाचे करार केले. मात्र, अमेरिका आणि भारतातील व्यापार करार पुढे जात नाहीत. अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी भारतावर दबाव टाकत आहे.

अमेरिकेने मान्य केले की, भारत काही मुद्द्यांवर सतर्क आहे. पण नवीन प्रस्ताव सर्वोत्तम आहे आणि आमच्यासाठी दुर्मिळ पोहोच दर्शवितो असे म्हटले आहे. यामुळे लवकरच भारत आणि अमेरिकेतील करार होतील, असे सांगितले जात आहे. अमेरिका भारताला मोठी बाजारपेठ म्हणून पाहतो, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना भारतासोबत करार करायची आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.