Year ender 2025: स्मृती मंधानाचं लग्न ते आशिया कप ट्रॉफीचा वाद! हे पाच वाद क्रिकेटविश्वात गाजले
GH News December 10, 2025 07:11 PM

नवं वर्ष 2026 च्या स्वागतासाठी आता जोरदार तयारी सुरु आहे. नव्या वर्षात नव्या संकल्पासह सुरुवात केली जाणार आहे. दुसरीकडे, सरत्या वर्षात काय काय घडलं याचाही लेखाजोखा मांडला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही घडलं आहे. पण 2025 या वर्षात क्रिकेटमध्ये बरंच काही घडलं. काही मैदानात आणि मैदानाबाहेर.. त्यामुळे क्रिकेटविश्वाला यंदा वादाची किनार लाभली. या वर्षभरात पाच विषयांनी क्रिकेटचं जग गाजवलं. त्यामुळे हे वर्ष चर्चेचा विषय ठरलं आहे. कोणत्या पाच वादांमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली ते जाणून घेऊयात..

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल लग्न आणि वाद : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबरला होणार होता. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र ऐन लग्नाच्या तोंडावर लग्न मोडलं आणि क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं. लग्नाच्या दिवशी दुपारी 4 वाजता अचानक स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर स्मृतीच्या मॅनेजरने मीडियाला सांगितलं की, वडिलांची तब्येत खराब असल्याने लग्न टाळलं गेलं आहे. मात्र त्यानंतर काही दिवस लोटले. या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या. स्मृती आणि पलाशने हे लग्न मोडल्याचं जाहीर केलं.

आशिया कप 2025 भारत-पाकिस्तान हँडशेक : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सर्व संबंध मोडले. त्याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानातही दिसले. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने नो हँडशेक पॉलिसी अवलंबली. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक केला नाही. त्यामुळे बराच वाद झाला. पण टीम इंडिया ठाम राहिली. इतकंच पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेत तिनचा पराभवाची धूळ चारली.

आशिया कप ट्रॉफी वाद: पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी चोरल्याचा वाद बराच चिघळला. भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि जेतेपदावर नाव कोरलं. पण पाकिस्तानच्या मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. इथपर्यंत ठीक होतं. पण मोहसिन नक्वी ट्रॉफी घेऊन गेला. त्यानंतर भारतीय संघाने ट्रॉफी विना जल्लोष केला. भारताने ट्रॉफी जिंकून 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही भारताला ट्रॉफी मिळालेली नाही.

आरसीबीच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी : आयपीएल इतिहासात 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं होतं. मात्र या विजयाच्या आनंदावर विरजण पडलं. गर्दीचं योग्य नियोजन न केल्याने एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर अलोट गर्दी जमा झाली. अनियोजित गर्दीमुले चेंगराचेंगरी झाली आणि काही लोकांना आपला जीव गमवावा लागला.

भारत इंग्लंड टेस्ट हँडशेक : भारतासाठी इंग्लंड दौरा खूपच चांगला गेला. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर भारताने कमबॅक केलं. तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. तर चौथा कसोटी सामना ड्रॉकडे झुकला असताना रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ओल्ड ट्रॅफर्डमध्ये बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत हँडशेक करण्यास मनाईल केली. जडेजा आणि वॉशिंग्टन दोघेही शतकाच्या उंबरठ्यावर होते आणि त्यामुळे त्यांनी नकार दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.