मोठी बातमी! टॅरिफनंतर आता ट्रम्प यांचा भारताला दुसरा सर्वात मोठा झटका, लाखो नोकऱ्या संकटात, नव्या निर्णायामुळे टेन्शन वाढलं
admin December 10, 2025 11:26 PM
[ad_1]

अमेरिका सध्या भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये, काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर अमेरिकेनं आपल्या H 1B व्हिसाच्या धोरणामध्ये बदल करत त्यावरील शुल्क तब्बल एक लाख डॉलर एवढं केलं. याचा सर्वात मोठा फटका भारताला बसला कारण जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक भारतीय लोक अमेरिकेमध्ये काम करत आहेत. दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेकडून H 1B व्हिसाच्या धोरणात आणखी एक नवा बदल करण्यात आला आहे, ज्याचा फटका देखील भारतालाच मोठ्या प्रमाणात बसला आहे. अमेरिकेच्या नव्या धोरणानुसार थोडी जरी चूक झाली तर तुमचा व्हिसा रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबत अमेरिकेच्या भारतामधील दूतावासाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत. दूतावासाने जराी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार यापुढे आता जर तुम्हाला H 1B व्हिसा लागत असेल तर सर्वात आधी तुमच्या सोशल मिडिया अकाऊंटसची तपासणी होणार आहे.

अमेरिकेच्या दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार H-1B व्हिसासाठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटची अत्यंत कडक तपासणी करण्यात येणार आहे. जर त्यांच्या कोणत्याही सोशल मिडीया अकांउटवर अमेरिकेच्या विरोधातील पोस्ट असेल किंवा काही संशयास्पद आढळून आल्यास अशा व्यक्तींचे एच 1बी व्हिसाचे अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा की आता तुमच्या एखाद्या पोस्टमुळे देखील किंवा कमेंटमुळे देखील तुमची अमेरिकेतून नोकरी तुमच्या हातून जाण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. कारण जगभरातून अमेरिकेमध्ये वास्तव्यासाठी जेवढे एच 1बी व्हिसासाठी अर्ज केले जातात त्यापैकी तब्बल 70 टक्के अर्ज हे भारतामधून केले जातात.

एवढंच नाही तर अमेरिकेकडून H1-B व्हिसासाठी भारतीय अर्जदारांच्या अपॉइंटमेट तारखा देखील पोस्टपॉन्ड करण्यात आल्या आहेत. 2026 पर्यंत अपॉइंटमेट तारखा पोस्टपॉन्ड करण्यात आल्या आहेत.याचा देखील भारताला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान एकीकडे अमेरिकेनं त्यांचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर करताना भारत हा एक महत्त्वाचा भागीदार देश असल्याचं म्हटलं आहे, मात्र दुसरीकडे भारताला मोठा झटका दिला आहे.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.