Amit Shah News : काँग्रेसच्या आव्हानानंतर शहांनी काही तासांतच दिली 'त्या' नेत्यांची यादी; 9 घटनांचा उल्लेख अन् केली बोलती बंद
Sarkarnama December 11, 2025 06:45 AM

Parliament session update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढविला होता. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार वंदे मातरमचा अपमान केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. वंदे वातरम सुरू असताना अनेक जण उठून सभागृहाच्या बाहेर जातात, असा दावाही त्यांनी केला होता.

शहांच्या आरोपांवर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी संबंधित सदस्यांची नावे सभागृहात देण्याचे आव्हान शहांना दिले होते. शहांनी ही आव्हान स्वीकारत काही तासांतच ही यादी राज्यसभेच्या सभापतींकडे सादर केली आहे. या यादीमध्ये नऊ घटनांचा उल्लेख करण्यात आला. संसदेसह काही बाहेरील घटनांचाही त्यामध्ये समावेश आहे.

अमित शहांनी नऊ घटनांची यादी देताना त्यासोबत यू-ट्यूब चॅनेल तसेच प्रसिध्द बातम्यांच्या लिंकही जोडल्या आहेत. या यादीत काँग्रेसचे सदस्यांसह समाजवादी पक्षाचे खासदार, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, आरजेडीचे आमदार, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदारांचे व्हिडीओ आहेत.

Sansad winter session : प्रियांका गांधींनी 'संसद' गाजवली; मोदीही कोसो दूर, एका खासदाराच्या वादग्रस्त विधानानेही खळबळ

शहांनी यादीत नमूद केलेल्या घटना –

१.       ८ डिसेंबर २०२५ – काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी वंदे मातरम गायला नकार दिला. त्यासाठी धार्मिक आस्थेचा हवाला दिला होता.

२.       ८ डिसेंबर २०२५ – नॅशनल कॉन्फरन्सचे आगा सईद मेहदी यांनी संसदेत चर्चेदरम्यान गायला नकार दिला.

३.       २०१९ – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी लोकसभेत शपथेवेळी वंदे मातरम न म्हणण्यावर भाष्य केले होते.

४.       २०२५ – खासदार जियाऊर्रहमान बर्क यांनी आपल्या आजोबांचे समर्थन करत वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला होता.

Amit Shah News : प्रियांका गांधींचा मोदींना करारा जवाब; अमित शहांनी राज्यसभेत कात्रीत पकडलं, ‘त्या’ खासदारांची यादी तयार...

५.       २०१८ – काँग्रेस रॅलीदरम्यान वंदे मातरमचे केवळ एकच कडवे गाण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या येण्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते.

६.       २०१९ – मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी धार्मिक कारण देत वंदे मातरम गाण्यास नकार दिला होता.

७.       २०२२ – काँग्रेस नेते सिध्दरामय्या यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना वंदे मातरम गाण्यापासून रोखले.

८.       २०२५ – समाजवादी पक्षाने महाराष्ट्रातील शाळांमध्ये वंदे मातरम बंधनकारक करण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

९.       २०२५ – आरजेडीचे आमदार रऊद आलम यांनी विधानसभेत वंदे मातरम सुरू असताना उभे राहण्यास नकार दिला होता.  

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.