गीत गायन स्पर्धेचे वाडा येथे आयोजन
esakal December 11, 2025 09:45 AM

गीत गायन स्पर्धेचे वाडा येथे आयोजन
दीक्षित फाऊंडेशनचा पुढाकारः नावनोंदणीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १०ः येथील दीक्षित फाऊंडेशनतर्फे जानेवारीत वाडा (ता. देवगड) येथील श्री दत्त मंगल कार्यालयात गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालगट, कुमारगट आणि खुला गट अशा तीन विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात येईल. इच्छुकांनी १५ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या ३ आणि ४ जानेवारीला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत विजेत्यांसाठी दिली जाणारी बक्षिसे अनुक्रमे अशी, बालगट (पहिली ते चौथी ) -१५००, १०००, ७५०, उत्तेजनार्थ ५००, कुमार गट -(पाचवी त दहावी) २०००, १५००, १००० उत्तेजनार्थ ५००, खुला गट -५०००, ४०००, ३००० उत्तेजनार्थ दोन बक्षिसे यामध्ये प्रत्येकी १०००, नाव नोंदणीसाठी बालगट राधिका काणे, कुमारगट - हर्षद जोशी, खुला गट -प्रियांका वेलणकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा सकाळी ८.३० वाजता सुरु होईल. स्पर्धक आणि सोबत येणाऱ्यांसाठी नाश्ता व भोजन व्यवस्था करण्यात येईल. ३ ला सुरुवातीला बालगटाची स्पर्धा घेण्यात येईल, ती संपल्यावर लगेचच कुमार गटाची स्पर्धा सुरु होईल, खुल्या गटाची स्पर्धा ४ ला होईल. बालगटातील स्पर्धकांना सादरीकरणासाठी किमान चार मिनिटे आणि कमाल सहा मिनिटे तर कुमार व खुला गटासाठी वेळमर्यादा किमान पाच मिनिटे आणि कमाल सात मिनिटे इतकी राहील. साथीदारांची व्यवस्था आयोजकांद्वारे केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.