बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आपल्या अभिनयाचा खास ठसा त्याने सोडला. बिग बॉस मराठीलाही होस्ट करताना रितेश दिसला. रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय राहतो. पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजासोबत धमाल मस्तीचे व्हिडीओ शेअर करतो. लातूर जिल्ह्यांतील त्यांच्या मूळगावी कुटुंबासोबत वेळ घालवताना जेनेलिया आणि रितेश कायमच दिसतात. रितेश देशमुख आणि जेनेलिया कायचम पार्टी असो किंवा बॉलिवूडचा एखादा कार्यक्रम सोबतच असतात. रितेश देशमुख कधीच जेनेलियाचा हात सोडत नाही. चाहत्यांनाही रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी प्रचंड आवडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये जेनेलियाच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत आहे.
कार्यक्रमातून रितेश देशमुख आणि जेनेलिया जात होते. यादरम्यान रितेश देशमुख हा रिया चक्रवर्तीला म्हणतो की, तुला मी सोडू का? यावेळी रितेश देशमुख याचे बोलणे ऐकून जेनेलिया रागाने बघाताना दिसतंय. यावर रिया म्हणते की, माझी कार आहे. रितेश आणि रिया बोलत असताना चांगलीच संतापाने बघताना जेनेलिया दिसली. हेच नाही तर धन्यवाद बोलताना रिया चक्रवर्ती हिने थेट रितेश देशमुखच्या दाढीला हात लावला.
तिने रितेश देशमुखची गळाभेट घेण्याअगोदर जेनेलियाची देखील गळाभेट घेतली. मात्र, जेनेलिया तिला बोलली नाही. रितेश देशमुखची गळाभेट घेऊन बाय बोलून जाताना रिया चक्रवर्ती दिसली. त्यावेळी जेनेलिया तिला आनंदाने बाय बोलताना दिसली. रितेश देशमुख रिया चक्रवर्तीला सोडू का विचारताना दिसला, त्यावेळी जेनेलियाचा चेहरा बरेच काही सांगून गेला.
तिला रितेश देशमुख याचे विचारणे अजिबातच पटले नसल्याचे तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. आता रितेश देशमुख, जेनेलिया आणि रिया यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. यापूर्वीही असाच एक व्हिडीओ जेनेलियाचा व्हायरल होताना दिसला. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी लग्न केले. दोघांची दोन मुले देखील आहेत