Anand Dave on Kumbh Mela: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्त साधुग्राम वसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. यापूर्वीच स्थानिक नाशिककरांनी याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
काही काळाच्या या सोहळ्यासाठी काही वर्षांपासूनची घनदाट झाडं तोडू नये, तपोवनाचं पावित्र राखावं अशा शब्दांत या नागरिकांना सरकारला सवाल केला आहे. त्यातच आता हिंदुत्ववादी नेते आनंद देवे यांनी देखील सरकारला झाडं तोडण्याच्या निर्णयावरुन जाब विचारला आहे. कुंभमेळ्यासाठी झाडं तोडता हे कुठलं हिंदुत्व आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
Andekar in Election: 40 वर्षे गुन्हेगारीत... आंदेकर कुटुंबिय पुन्हा निवडणुकीत...! उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून हिरवा कंदील?दवे म्हणाले, आम्ही इथं येण्याच्या आधी आयुक्तांना भेटलो. त्यांना झाड भेट दिलं, वृक्षतोडीवर त्यांच्याकडं उत्तर नाही तसंच सरकारसह मनपाकडंही याचं उत्तर नाही. हिंदू लोकांच्या नावावर काही मोजक्या हिंदूंच्या फायद्यासाठी हे सगळं सुरू आहे. झाडे तोडून जमिनी मिळवा, असं त्यांचं दिसतंय. त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आम्ही झाडे लावून सरकारची जिरवू, जी नवी झाडं लावणार ती कुठं लावणार हे अद्याप निश्चित नाही. आम्ही यासाठी सभा घेणार आहोत. याबाबत नाशिकला पाहिलं आंदोलन हिंदू महासभेनं केलं आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
PMC Election: सर्व्हेत भाजपच्या 50 जागा धोक्यात! मित्रपक्षांना विचारात घ्या अन्यथा...; राष्ट्रवादीचा भाजपला इशारानाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी आम्ही आत्मदहन करू, पालिकेच्या विरोधात आंदोलन करू. कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण त्यासाठी झाडे तोडू नका. काशी, पंढरपूर इथं कॉरिडॉरसाठी झाडं, मंदिर तोडली, हे कुठलं हिंदुत्व हेच आम्हाला कळत नाही. जिथं रामाचे पाय लागले तिथं कुऱ्हाडीचे घाव लावू नका. सरकारला आम्ही एकही झाड तोडू देणार नाही, अशा शब्दांत आनंद दवे यांनी सरकारला धारेवर धरलं.