आशिकसोबत बायको पोहोचली OYO हॉटेलवर, नवऱ्याने पाहिले अन्… नंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल
Tv9 Marathi December 12, 2025 09:45 PM

सोशल मीडियावर कधी आणि कुठले व्हिडीओ व्हायरल होतील याचा नेम नसतो. काही व्हिडीओ हसवणारे असतात, काही थक्क करणारे आणि तर काही असे असतात की ते पाहून लोकांचा राग अनावर होतो. सध्या अशाच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरा आपल्या शिक्षिका पत्नीला तिच्या सीनियर शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये पकडतो. त्यानंतर जो हंगामा झाला, तो पाहून आजूबाजूचे लोकही थक्क झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक नवरा आपल्या शिक्षिका असलेल्या बायकोला भर रस्त्यात गाडीच्या शेजारी मारताना दिसत आहे. कारण त्याची बायको एका सीनियर शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये गेली होती. नवऱ्याला कळताच तो हॉटेलवर पोहोचतो आणि दोघांना रंगेहात पकडतो. त्यानंतर जो गोंधळ उडाला, तो पाहून आजूबाजूचे लोकही हैराण झाले. हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर @M__Rkhan नावाच्या अकाउंटने शेअर केला. हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स देखील केल्या आहेत.

पति ने टीचर पत्नी को सीनियर टीचर के साथ ओयो
में रंगे हाथों पकड़ा,सड़क पर पत्नी की पिटाई पुलिस
ने मौक़े पर किया गिरफतार,ऐसे टीचर्स बच्चों को
क्या पढ़ाएंगे और क्या सं-स्कार देंगें,शर्मनाक😔😔 pic.twitter.com/QsKZJwT71f

— @MR.Khan (@M__Rkhan)

व्हिडीओमध्ये नेमकं काय घडले?

व्हिडीओच्या सुरुवातीला रस्त्यावर नवरा-बायकोचे भांडण दिसते. नवरा संतापाने लाल होऊन आपल्या बायकोला ओरडतो आणि मारहाण देखील करतो. तो वारंवार म्हणतो, “तुला बिलकुल लाज वाटली नाही? तू OYO हॉटेलमध्ये गेली होतीस! मला सर्व कळले आहे.” बायको समोर शांतपणे उभी राहते, तर नवरा सतत आरोप करत राहतो की ती आपल्या सीनियर शिक्षकासोबत हॉटेलमध्ये होती. जवळून जाणारे लोकही हा तमाशा पाहण्यासाठी थांबतात. अनेकजण मोबाइल काढून व्हिडीओ काढू लागतात. वातावरण पूर्णपणे गोंधळात बदलते. थोड्या वेळाने पोलीसही घटनास्थळी पोहोचतात आणि गर्दी हटवण्याचा प्रयत्न करतात. नंतर पोलिसांनी नवऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून ताब्यातही घेतात.

लोकांच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स

व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांच्या कमेंट्सचा पूर पाहायला मिळत आहे. कोणीतरी लिहिले आहे की शिक्षक असे असतील तर मुले काय शिकवतील? कोणीतरी म्हणाले कोण चुकीचे आहे, कोण बरोबर आहे, हा तपासाचा विषय आहे, पण रस्त्यावर अशी मारहाण पूर्णपणे चुकीची आहे. काही लोकांनी या घटनेला लज्जास्पद म्हटले तर काहींनी सांगितले की अशी वैयक्तिक प्रकरणे सोशल मीडियावर पसरवू नयेत. जसे हा व्हिडीओ व्हायरल झाला, तसे सोशल मीडियावर लोकांनी आपापल्या अंदाजात प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही लोकांनी नवऱ्याच्या रागाला योग्य ठरवत लिहिले की जर एखाद्या नवऱ्याची अशी फसवणूक झाली तर राग येणे स्वाभाविक आहे, ज्या माणसाने सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असेल, तो कसा शांत राहू शकतो. सोशल मीडियावर काही लोक मजेशीर अंदाजातही लिहू लागले की OYOवाल्यांचे पुन्हा एकदा फ्री प्रमोशन झाले. कोणीतरी म्हणाले भाऊ, घरी नेटफ्लिक्स चालते, OYOवर रिअल ड्रामा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.