निरगुडसर : वळती (ता.आंबेगाव) येथील थिटे मळ्यात शुक्रवार (ता.१२) रोजी पहाटे नर जातीचा आठ महिन्याचा बछडा जेरबंद झाला. आंबेगाव तालुक्यातील वळती परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.
जवळेतील लायगुडे मळ्यात बछडा जेरबंदयेथील थिटे मळ्यात बिबट्याचा वावर वाढल्याने गोविंद गांजवे यांच्या शेतात गुरुवार (ता.११) रोजी सायंकाळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता,अखेर शुक्रवार (ता.१२) रोजी पहाटे आठ महिन्याचा बछडा वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला.शुक्रवारी सकाळी बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वनपाल फुलमाळी,शरद जाधव आणि रेस्क्यू टीम दाखल होऊन बिबट्याचा बछडा ताब्यात घेतला.फोटो खाली ओळ:वळती (ता.आंबेगाव) येथील थिटेमळ्यात आठ महिन्याचा बछडा जेरबंद झाला.