स्वप्नात तांदूळ दिसणे शुभ आहे की अशुभ? जाणून घ्या, तुम्हाला कोणते संकेत मिळू शकतात?
Tv9 Marathi December 14, 2025 01:45 AM

स्वप्न पाहणे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कधीकधी आपल्यापैकी अनेकजण स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींबद्दल विचार करत असतो. तर ज्योतिषशास्त्रानुसार कधीकधी तुम्ही पाहिलेले स्वप्न तीन दिवसांच्या आत त्याचे परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक, शुभ किंवा अशुभ असू शकतात. अशातच तुम्हाला जर स्वप्नात तांदुळ दिसल्यावर त्याचा तुमच्या जीवनावर कोणता परिणाम पडू शकतो. स्वप्नात तांदुळ पाहणे शुभ आहे की अशुभ हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या काळात तांदळाशिवाय कोणतेही शुभ कार्य शक्य नाही. प्रत्येक शुभ कार्यात तांदळांना विशेष महत्त्व आहे. स्वप्नात तांदुळ पाहिल्याने काय परिणाम होतात हे जाणून घेणे मनोरंजक आहे. साधारणपणे, स्वप्नात शुभ समारंभात वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाहिल्याने शुभ परिणाम व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. स्वप्नात सुपारीची पाने, दिवे, तांदुळ, हळद, केशर आणि फुले यासारख्या शुभ वस्तू पाहणे अशुभ नसून शुभ मानले जाते.

ज्योतिषशास्त्र यांच्या नुसार तांदूळाचा वापर प्रामुख्याने आशीर्वाद देण्यासाठी शुभ समारंभ आणि लग्नासाठी वापरला जातो. हळद किंवा केशर तांदुळ सर्व शुभ प्रसंगी वापरला जाण्याच्या गोष्टी आहेत. जसे की गृहप्रवेशाच्या वेळी, नामकरण समारंभ आणि इतर शुभ कार्यात तसेच देवांची पुजा करण्यासाठी देखील तांदुळाचा वापर केलाच जातो.

तांदळाचे स्वप्न पाहताना स्वप्नातील दिवसाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. मंगळवार आणि शुक्रवारी या दिवशी तांदळाचे स्वप्न पाहणे हे सूचित करते की कुटुंबात लग्न होणार आहे. हे वैवाहिक जीवनासाठी एक चांगले लक्षण आहे. शिवाय हे स्वप्न शुभ घटना, घरात मुलीचे आगमन किंवा एखाद्या शुभ वस्तूचे आगमन देखील दर्शवू शकते.

जर तुम्हाला चांगले स्वप्न पडले तर काय करावे?

जर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुमच्या कुटुंबाच्या देवतेला किंवा तुमच्या आवडत्या देवतेला, जसे की शिवाला, प्रार्थना करा. जर तुम्ही तुमच्या परिसरातील मंदिरात जाऊन प्रार्थना, पूजा आणि आराधना केली तर तुम्हाला त्वरित लाभ मिळतील. खरं तर स्वप्नात तांदूळ दिसणे हे एक अतिशय शुभ चिन्ह आहे. ते सूचित करते की काहीतरी खूप चांगले घडणार आहे. तसेच ज्योतिष शास्त्र सांगतात की हे स्वप्न त्या शुभतेचे पूर्वचित्रण करते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.