व्हॉट्सॲप कॉलवर बोलताना ट्रॅक केलं जाऊ शकतं तुमचं लोकेशन, आताच फोनमध्ये चालू करा 'ही' सेटिंग
Tv9 Marathi December 14, 2025 01:45 AM

व्हॉट्सॲप हे जगातील सर्वाधिकरित्या वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे. आपण प्रत्येकजण व्हॉट्सॲप वापरत आहोत. व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्यासोबतच ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगही करता येतं. पण आजच्या या आधुनिक युगात व्हॉट्सॲपच्या माध्यमातुन डिजिटल फसवणूकीची अनेक प्रकरणं समोर येताय. पण तुम्हाला माहित आहे का की व्हॉट्सॲप कॉलद्वारेही तुमचं लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकतं. त्यामुळे तुमच्यासोबतही असं कोणी करू नये म्हणून व्हॉट्सॲपने यासाठीही एक सेफ्टी फिचर दिलेलं आहे, परंतु आपल्यापैकी अनेकांना या उपयुक्त फीचरबद्दल योग्य माहिती नाही. हे फीचर बाय डीफॉल्ट बंद असते, मात्र सुरक्षेसाठी अत्यंत फायदेशीर असल्याने ॲपमधून हे फिचर चालू केले पाहिजे. तर आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते फीचर आहे जे व्हॉट्सॲप कॉलद्वारे तुमचे लोकेशन ट्रॅक होण्यापासून रोखू शकते आणि तुम्ही हे फीचर कसे चालू करू शकता?

व्हॉट्सॲप कॉल दरम्यान हॅकर्स किंवा स्कॅमर्सना तुमचे लोकेशन ट्रॅक करण्यापासून रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपचे Protect IP Address in Calls फीचर चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हे फीचर कसे चालू करायचे हे माहित नसेल, तर काही सोप्या स्टेप्समध्ये ही प्रक्रिया जाणून घेऊयात.

व्हॉट्सअॅप फीचर: ते कसे चालू करायचे ?

प्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp उघडा.

आता होम पेजच्या टॉपवरील तीन ठिपक्यांवर क्लिक करा.

या तीन ठिपक्यांना टॅप केल्यानंतर तुम्हाला ॲपच्या सेटिंग्जमध्ये जा

तिथे गेल्यावर तुम्हाला Privacy पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

येथे तुम्हाला Privacy पर्यायामध्ये जा आणि ॲडव्हांसचा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.

येथे तुम्हाला “Protect IP Address in Calls” हे सेफ्टी फिचर मिळेल, जे डीफॉल्टनुसार बंद असते. येथे हे फिचर चालू करून तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप खात्याची सुरक्षा मजबूत करू शकता. एकदा हे सेफ्टी फिचर चालू झाल्यानंतर तुमचे सर्व व्हॉट्सॲप कॉल कंपनीच्या सर्व्हरमधून जातील, ज्यामुळे लोकेशन शोधता येणार नाहीत.

सुरक्षिततेसाठी योग्य पाऊल

व्हॉट्सॲप कॉलदरम्यान तुमचं लोकेशन कुणीही ट्रॅक करू शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे फीचर ऑन करू शकता. ऑनलाईन प्रायव्हसीसाठी हे फीचर ऑन करणे हे तुमच्या सुरक्षिततेसाठी योग्य पाऊल ठरू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.