२०२५ या वर्षातील सर्वात गमतीशीर बाब आणि तितकीच प्रभावित करणारी बाब म्हणजे वर्षाच्या पूर्वार्धात अन् उत्तरार्धात ठळकपणे दिसलेली पोलिसिंग. वर्षाच्या पूर्वार्धातील मवाळ भूमिकेतील पोलिसिंग उत्तरार्धात गुन्हेगारीविरोधात आक्रमक झालेली पाहावयास मिळाली, हे चालू वर्षांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. असे असले तरी शहरात गुन्ह्यांची संख्या जशी वाढली आहे, तशी गेल्या नऊ वर्षांतील उच्चांक खुनाच्या घटनांमध्ये गाठला आहे.
चालू वर्षात ४६ खून झाले आहेत. दिवाळीपूर्वी भाजपच्या माजी दोन नगरसेवकांना गंभीर गुन्ह्यात अटक झाली, तर पाठोपाठ केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे खंदे समर्थक प्रकाश लोंढे त्यांच्या दोन्ही मुलांसह जेलवारीने जसे वर्ष गाजले, तसेच गुन्हेगारांनी ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ म्हटले असले तरी ‘सच बोल’ पट्ट्याची प्रचीतीचा परिणाम किती, हे आगामी वर्षात दिसेलच.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन वर्षांचा नोव्हेंबरमध्ये कार्यकाल पूर्ण केला. गुन्हेगारीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिकेला प्राधान्य दिले. असे असले तरी, २०२५च्या सुरवातीच्या काही महिन्यात पोलिसांची भूमिका मिळमिळीत होती. मात्र गुन्हेगारीच्या वाढता आकड्यांनी टीकेची झोड उठली. उपनगरातील दोन सख्ख्या भावांचा खून आणि पाठोपाठ नांदूर नाका परिसरात राजकीय वादातून तरुणाचा खून या घटनांनी शहर हादरले.
आयुक्त कर्णिक यांनी वाढत्या दबावाला झुगारून देत कठोर उपाययोजना सुरू केल्या. स्टॉप ॲन्ड सर्चिंग मोहिमेमुळे वर्षाच्या सुरवातीलाच आडगाव ते पंचवटी हद्दीतील महामार्गावरील पोलिसांचा सिनेस्टाईल गांजाची तस्करी वाहनांचा पाठलागाचा थरार रंगला. टवाळखोरांविरोधात धडक कारवाईचा धडाका लावला. खात्याअंतर्गतच गुन्हेगारांशी ‘मिलीभगत’ करणाऱ्याविरुद्ध आयुक्तांनी थेट बडतर्फीचा दणका दिला आहे.
२०२५ या वर्षभरात शहरात तब्बल ४६ खून झाले आहेत. ४६ पैकी ४५ खुनाची उकल झाली आहे. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ७ खून झाले आहेत. एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांनी पोलिसांवर टीकेची झोड उठली. यानंतर आक्रमक झालेल्या पोलिसांनी कठोर उपाययोजना राबविल्या. त्याचे परिणामही दिसून आले. ऑक्टोबरमध्ये तीन खून, तर नोव्हेंबरमध्ये एकही खून झाला नाही. असे असले तरी २०१७ मध्ये ४१ खुनाची नोंद होती. २०२५ मध्ये ४६ खुनाची नोंद झाली आहे. चालू वर्षात प्राणघातक हल्ल्यांनीही शंभरी गाठली. वर्षभरात १०३ प्राणघातक हल्ले झाले आहेत.
२०२५ या वर्षातील पोलिसांची उत्तम कामगिरी म्हणजे लोंढे, बागूल या राजकीय वरदहस्त असलेल्या टोळीवर घातलेला घाव. रिपाइं उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आणि पीएल या कुख्यात ग्रुपचा म्होरक्या प्रकाश लोंढे व त्याच्या दोन्ही मुलांसह साथीदारांविरुद्ध गोळीबार, खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल केले. पाठोपाठ शिवसेनेतून (उबाठा) भाजपमध्ये गेलेले सुनील बागूल यांच्या साम्राज्यावर पोलिसांनी घाव घातला.
बागूल टोळीच्या प्रमुखांसह गुंडांवर दिवाळीमध्ये बालेकिल्ल्यात मेजवानी दिली. त्याचा परिणाम रिक्षाचालकांची मुजोरीच संपल्याचे चित्र आहे. लोंढे टोळीवर आयुक्तांनी ‘मकोका’ कारवाई केली आहे. असे असले तरी वकील प्रशांत जाधव यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील दीपक बडगुजरसह नाशिक रोडच्या बेद टोळीवर मकोकाचा प्रस्ताव
पोलिस महासंचालक कार्यालयातून फेटाळल्याची नामुष्की ओढवली.
सिडकोतील वैभव देवरे याच्या अवैध सावकारीसह खंडणी उकळण्याचे प्रकरण २०२४ पासून उजेडात आले ते २०२५ मध्येही काही गुन्हे दाखल झाले. त्याच्या कारनाम्यांची चर्चा शहरभर असतानाच, पंचवटीतील रोहित कुंडलवाल, नाशिक रोडचा कैलास मैद यासारख्या बड्या अवैध सावकारांविरोधातही गुन्हे दाखल झाले. खंडण्या उकळून कर्जदारांवर आत्महत्या करण्याची वेळ या सावकारांनी आणली.
तर वाढती बालगुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अवघ्या १७ वर्षाच्या विधीसंघर्षिताने महिन्याभरात दोन खून केले. तर सिडकोत एका विधीसंघर्षिताचा आपसांतील वादातून भरदिवसा खून करण्यात आला. चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग सामाजिकदृष्ट्या चिंताजनक आहे.
बालेकिल्ला पॅटर्न
स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी दिवसरात्र गस्ती
सोशल मीडियावरून ‘भाईगिरी’ करणाऱ्यांना ‘पाहुणचार’
‘नाशिक जिल्हा, गुन्हेगारीचा बालेकिल्ला’ पॅटर्न लोकप्रिय
राजकीय क्षेत्रातील गुन्हेगारांनाही ‘पाहुणचार’
सायबर गुन्हेगारीचे आव्हान
२०२५ मध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या प्रकाराने अनेकांना कोट्यवधींचा गंडा
केंद्रीय गृह विभागामार्फत सायबर गुन्हेगारी विरोधात जनजागृती मोहीम
पोलिसांकडून शाळा-महाविद्यालयांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचार-प्रसार
उच्चशिक्षित सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.
आगामी सिंहस्थ अन् वाहतूक नियंत्रण
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांकडून नियोजन केले आहे. शहरात किमान तीन हजार सीसीटीव्ही बसविणार आहेत. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी आतापासूनच कारवाई सुरू केली आहे. सिग्नल यंत्रणेवरील सीसीटीव्ही अद्याप कार्यान्वित नाहीत. तर, पार्किंगचा सावळागोंधळ सुरूच आहे. वाहतूक विभागाकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल करीत त्यांना शिस्त लावण्यात येत आहे. सिंहस्थात भाविकांची पहिली भेट ही रिक्षाचालकांशीच होणार असल्याने रिक्षाचालकांना वाहतूक शिस्तीचे धडेही दिले जात आहेत.

Kolhapur crime : बिहारमधील गॅंगवॉरचा थरार कोल्हापुरात उघड; गॅंगस्टरचा खून करून आलेले दोघे अटकेतआगामी सिंहस्थ अन् वाहतूक नियंत्रण