Maharashtra Live News Update: मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला वाचवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होतोय - विजय कुंभार
Saam TV December 16, 2025 07:45 PM
Pune: मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला वाचवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होतोय - विजय कुंभार

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार -

मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला वाचवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होतोय, हे आता उघड झालंय

कारण शितल तेजवानी च्या अर्जाचा हवाला देऊनच अमेडिया कंपनी ने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पञ लिहिलंय..

आणि विशेष म्हणजे पार्थ पवार यांनीच हे पञ दिलंय जिल्हा प्रशासनाला

माध्यमांमध्ये बातम्या येत असल्यानंतर पार्थ पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं

या माध्यमातून खुलासा करण्याचे व भेटीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची वेळ मागितली

पत्राच्या शेवट पार्थ पवार यांनी सही केली आहे

Nashik: राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, कोर्टाने शिक्षा ठेवली कायम

नाशिक -

- राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत

- शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम

- प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम

- जिल्हा सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी सुनावली शिक्षा

- कोकाटेवर अटकेची टांगती तलवार

- कोकाटेचे मंत्री पद ही धोक्यात

बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

तरवाडे बुद्रुक येथील शाळेतून घरी येताना रहस्यमयीरित्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री शिंदेचा मृतदेह गावाशेजारील विहिरीत आढळला

घटनेची माहिती मिळताच जळगाव एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

शाळेतून घरी परतताना रहस्यरित्या बेपत्ता झालेल्या धनश्रीचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी गावाजवळीलच विहिरीत सापडल्यामुळे प्रचंड खडबड उडाली आहे*मृत्यू *मृत्यूदेहावर छवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे खरं कारण स्पष्ट होणार आहे.

लातूर तालुक्यात डोंगर पोखरून जमिनीची चाळण; तहसीलदारांचे दुर्लक्ष, मंत्री बावनकुळे आज लातूर दौऱ्यावर ,कारवाई करणार का?

लातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरून अवैध उत्खनन सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील, सोनवती भोयरा, आकरवाई, एकुर्गा, यासह इतर भागात सर्रास मुरूम माफियांकडून मुरुम उपसा सुरू आहे.तर महसूल विभागाच्या नाकाखालीच डोंगर फोडून मुरूम व मातीचे सर्रास उत्खनन केले जात असून संपूर्ण परिसरातील जमिनीची ही चाळण झाली आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे तहसीलदार व संबंधित यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कुख्यात गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूरला अटक

विरार मधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकऱणात मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तरप्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून अटक केली आहे.

...तोपर्यंत वाहतूक कोंडी सुटणार नाही, रवींद्र धंगेकर यांचा प्रशासनाला घरचा आहेर

पुण्यातील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न आहे. जो पर्यंत नेते मंडळी वाहतूक कोंडी मध्ये अडकणार नाही तो पर्यंत त्यावर मार्ग निघणार नाही. नेत्यांनी आता पुण्यात फिरताना दुचाकी नाही सायकल वर यावं, अशी टीका शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. पुणे महापालिकेची यंदाची निवडणूक ही वाहतूक कोंडी या विषयाला धरूनच लढली जाईल. शहरात कुठेही फिरायचे असेल तरी त्रास होतो, शहरातून बाहेर जाण्यासाठी २ तास लागतात. वाहतूक कोंडी त्यासोबत वी आय पी आणि नेत्यांच्या दौऱ्यामुळे पुणेकरांना होणारा त्रास यावर तात्काळ उपाययोजना राबवणं गरजेचे असल्याचं ते म्हणाले. तसंच येत्या काळात पुणे महापालिका निवडणुकीची तयारी आमची सुरू झाली असून युती बाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं ही धंगेकर म्हणाले, त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...

शितल तेजवानीला बावधन दोन पोलिसांनी येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

मुंढवा शासकीय जमीन विक्री व्यवहारातील मुख्य आरोपी पैकी एक असलेल्या शितल तेजवानीला अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मागील काही दिवसापासून शितल तेजवानी ही पुणे शहर पोलिसांच्या पोलिस कस्टडीमध्ये होती. मात्र तिची पुणे पोलिसाची कस्टडी समताच पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी आज सकाळी तिला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतला आहे. शितल तेजवानी चा वैद्यकीय तपास झाल्यानंतर बावधन पोलीस तिला पौड कोर्टात हजर करणार आहेत.

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार निवडणुकीच्या मैदानात; प्रभाग २४ मधून लढण्याचा मानस

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार जोमाने तयारीला लागले असून, सर्वपक्षीय पातळीवर उमेदवारी अर्जांचे वाटपही सुरू झाले आहे. राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाही नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत.

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

निवडणुकीची घोषणा होताच युती अन् आघड्याच्या चर्लेला वेग आलाय. मुंबईसह पाच महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत. त्या चर्चेसाठी राऊत राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत.

महाडच्या पडवी गावात भाजपचा बॅनर फाडला,कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण

महाड तालुक्यातील पडवी गावात भाजपचा बॅनर फाडण्यात आला आहे. यामध्ये केवळ शिवसमर्थांचा फोटो वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रविण दरेकर यांच्यासह सर्व नेत्यांचे बॅनरवरील फोटो आणि मजकुर फाडण्यात आला आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पडवी गावाबाहेर बस थांबा शेडचे उद्घाटन झाले त्याचा हा बॅनर होता. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, खासदार धैर्यशील पाटील, निरंजन डावखरे यांचे फोटो आहेत.

PMC Election: पुणे महापालिका तारखा जाहीर होताच मनसे आणि ठाकरे गट लागले कामाला

दोन्ही पक्ष एकत्रित येत पुन्हा घेणार बैठका

उद्या आणि परवा अशा दोन दिवस मनसे आणि ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या होणार बैठक

मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन महत्त्वाच्या बैठका शहरात होणार

यापूर्वी देखील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात दोन्ही नेत्यांनी केली होती चर्चा

उद्या आणि परवा होणाऱ्या बैठकीत दोन्ही पक्ष युतीबाबत चर्चा करून घेणार महत्त्वाचा निर्णय

Madha: अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी माढ्यात शेतकऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

माढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी यासाठी माढा तालुक्यातील शेतकर्यांनी तहसील कार्यालयावर भीक मांगो आंदोलन केले.

शेतकरी नेते दादा कळसाईत यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील शेतकर्यांनी सरकार विरोधात भीक मांगो

आंदोलन केले. जमा झालेली रक्कम तहसीलदारांना देण्यात आली.

Municipal Corporation Election: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बदल्यांचे संकेत?

मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग मंगळवारी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपनिरीक्षकांपासून ते वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत, कालावधी पूर्ण होऊनही एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आयोगाकडून मागवली जाणार आहे. निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची मानली जात आहे. या प्रक्रियेनंतर पोलीस विभागात मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी पक्षांचे आगमन

महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा पक्षी साप्ताह निमित्ताने प्रगणा पार पडली यात 12,000 पाणपक्षी 5500 गवताळ पक्षांची नोंद झली आहे. सध्या विविध पक्षांचे दर्शन पर्यटकांना होत असून सुट्टीच्या दिवशी अभायरण्यात पर्यटकांची गर्दी होत आहे.चमचा,शरटी,पाणकाडी बगळा,पाणकावळे,जांभळी पाणकोंबडी,वारकरी,जांभळी पाणकोंबडी,राखी बगळा,राज्यपक्षी हरियाल यासह अनेक देशी पक्षांच्या वास्तव्याने अभयारण्यात पक्षांचा किलबिलाट कानावर पडत असल्याने पक्षी प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे

Sindhudurg: वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९७० शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांची ओरोस येथे भेट घेऊन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम देण्याची मागणी केली. मागील वर्षी २०२४ -२५ मध्ये सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांनी फळपीक विमा उतरविला होता मात्र त्यातील ९७० शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना फळपीक विम्याची रक्कम देण्याची मागणी वैभव नाईक यानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Solapur: सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

- भाजपा आमदार देवेंद्र कोठें कडून " मिशन 75 साठी है तैयार हम " चा नारा

- सोलापूरची विमानसेवा, आयटी पार्क अशा अनेक विकास कामांवर जनता भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचा भाजपाने व्यक्त केला विश्वास

- महापालिकेच्या 102 जागांसाठी भाजपाकडून निवडणूक लढण्यासाठी तब्बल बाराशे इच्छुकांनी घेतले अर्ज

मूर्तिजापूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई; थेट चार पदाधिकाऱ्यांचची पक्षातून हकालपट्टी.

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली.. मूर्तिजापूर येथील चार पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका घेतल्याने भाजपने पक्षातून हकालपट्टी केलीये. सहा वर्षांसाठी निलंबित त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. उमेदवारांच्या तक्रारीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी ही कारवाई केली. मूर्तिजापूर येथील भाजपचे मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल पिंपळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष श्रीकांत रामेकर, नमामी गंगे अभियान प्रमुख नितीन भटकर असे कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे.. दरम्यान, मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विचारांशी गद्दारी करण्यासह उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी झाली आहे... जिल्ह्यात या अगोदर देखील अकोट तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होत.

Yavatmal: यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गट करणार वोटर क्लिप वितरणाची तक्रार

अँकर - यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेना, भाजप कडून मतदारांचे छायाचित्र असलेल्या वोटर स्लिप वितरित केल्या जात असून, हा प्रकार धोकादायक आहे,या फोटोचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती शिवसेना ठाकरे गटाने व्यक्त केली आहे. हा प्रकार डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारा असून निवडणूक विभागाने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे. मतदारांचे छायाचित्र असलेले अनधिकृत अॅप व वोटर स्लिप उमेदवारांच्या प्रचार चित्रासह वाटले जात असतानाही कारवाई का नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Dapoli: दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी स्टंटबाजी; पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

दापोलीतील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी होताना पहायला मिळतेय मात्र किना-यावर पर्यटकांच्या वाहनांची स्टंटबाजीची डोकेदुखी सध्या ठरतेय पर्यटकांकडून गाड्यांची रेस लावण्याचे प्रकार सर्रास घडताहेत.पर्यटकांकडून किना-यावर धुडगुस सुरु आहे.किना-यावर वाहन नेण्यास पोलीसांनी बंदी घातली होती मात्र या नियमांच उल्लंघन केल जातय वेळी पोलीसांनी यांना आवर घालून कठोर कारवई करण गरजेचे आहे.स्टंटबाजी व मद्यप्राशन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय.

आमदार महेंद्र दळवी यांचा शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्यावर निशाणा

आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांना लक्ष करीत शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी कॅशबाँब फोडला होता. या आरोपांना प्रत्योत्तर देताना दळवी यांची चित्रलेखा पाटील यांचा समाचार घेतला. चित्रलेखा पाटील या ड्रग्स घेऊन तर बोलत नाहीत ना असा गंभिर सवाल दळवी यांनी उपस्थित केला आहे. चित्रलेखा पाटील यांचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केलंय त्यांच्या कुटुंबात दोन पार्ट झालेत. सुपारी घेऊन बालिश बुद्धीने वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही असं दळवी म्हणाले.

Solapur: सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील माकप कडून महापौर पदासाठी नवीन फॉर्मुला

- सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी पाच वर्षात पाच महापौर देण्याची माकपची मागणी

- महानगरपालिकेत अडीच वर्षाची महापौरची मुदत आहे.एका वर्षासाठी करावी,पाच वर्षात पाच महापौर होतील.

- माजी आमदार नरसाया आडम यांनी पाच वर्षात एकदा संधी माकपला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली

- सोलापूर महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीत माकप कडून वीस जागांचा प्रस्ताव..

- महाविकास आघाडीतील नेते एकत्र बसून जागा वाटपाचा फॉर्मुला ठरवणार

Dhule: बिबट्या पाठोपाठ आता धुळ्याच्या शिरपूरमध्ये तरसांची वाढली दहशत

शिरपूर तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात दोन जण जखमी

एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरसांचा हल्ला

मोहीदा येथे पाणी पिण्यासाठी झोपडीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यावर लपून बसलेल्या तरसाचा हल्ला

तर पळासनेर येथे शेळ्या चारणाऱ्या एकावर तरसाने चढवला हल्ला

एक जण गंभीर जखमी

दोघांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरसांनी हल्ला चढवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Solapur: सोलापुरात 50 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदाराला रंगेहात अटक

- उत्तर तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत हेडगिरे या नायब तहसीलदारावर पुणे अँटी करप्शन विभागाची कारवाई

- मंडल अधिकाऱ्याचे थकलेले वेतन काढण्यासाठी मागितली होती साठ हजार रुपयांची लाच

- पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने सोलापुरात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ

- सदर घटनेबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

Dharashiv: धाराशिव मध्ये रिन्यू पवनचक्की आणि शेतकरी वादात 25 वर्ष तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

तुळजापुर तालुक्यातील देवसिंगा तुळ येथील घटना

शेतकऱ्याला मोबदला न मिळाल्याने पवनचक्की कंपनीच्या वीजतारा कापण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

वीजतारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याचं माहित असतानाही शेतकऱ्यांन तरुणाला तारा कापायला लावण्याचा नातेवाईकांचा आरोप

दत्ता वाघमारे असं मृत तरुणाचे नाव, पाचशे रुपयांच्या हजेरीसाठी शेतकरी वीज तारा कापायला त्याला घेऊन गेल्याचा आरोप

तुळजापूर पोलिसात शेतकऱ्यां विरोधात गुन्हा दाखल

पुणे महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर

उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिका निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर आले आहेत. आचारसंहिता जाहिरा झाल्यानंतर अजित पवार बारामती हॉस्टलमध्ये आज कार्यकर्त्यांसोबत बैठका आणि इच्छुका उमेदवारांची माहिती घेणार आहेत. पुणे पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांची माहिती घेणार आहेत. सकाळीच इच्छुकांनी गर्दी केली आहे

Solapur: सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या तीन दिवस होणार मुलाखती

- सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजप पक्षाकडे इच्छुकांची बहुगर्दी, 1200 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी दाखल केला आहे अर्ज.

- आजपासून तीन दिवस भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली माहिती.

- भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांने मुलाखतीसाठी एकटा उपस्थित राहण्याच्या सूचना

- मुलाखतीला येताना कोणतेही शक्ती प्रदर्शन न करण्याचा भाजप शहर कमिटीचा आदेश.

- पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शहरातील तीन आमदार उपस्थित राहण्याची शक्यता.

Mumbai: मुंबई आणि नवी मुंबईतील 36 प्रदूषित ठिकाणाचा पाहणी अहवाल सादर

विमानतळ परिसरातील वायू प्रदूषणबाबत उच्च न्यायालयाची विचारणा

वाढत्या प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती केली स्थापन

या समितीने 6 ते 13 डिसेंबर या कालावधीत मुंबई आणि नवी मुंबईतील 36 ठिकाणांना भेट घेऊन तेथील परिस्थिती विषद करणारा अहवाल उच्च न्यायालयात केला सादर

नवी मुंबई विमानतळ परिसरात खूप प्रदूषण असल्याच्या बातम्या येत आहेत या संदर्भात समितीने पाहणी केली का असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला

यासंदर्भात अभ्यास करून ठोस उपाय योजना सुचवा असा आदेश मुख्यांनयमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले

त्याच बरोबर विकासकांची बाजू ऐकण्यास उच्च न्यायालयाचा नकार

त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला मुदतवाढ

प्रचारात वाद टाळण्याचा सरकारचा प्रयत्न

समितीला 4 जानेवारी पर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली

मुंबई महानगर पालिका निवडणूक प्रचाराच्या काळात भाषावाद मुद्दा वादग्रस्त ठरू नये असा सहाषनाचा प्रयत्न असल्याची चर्चा

Pune Mhada: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर

या घरांसाठी १६ किंवा १७ डिसेंबरला सोडत काढली जाईल असे पुणे मंडळाकडून जाहिर करण्यात आले होते.

मात्र आता तांत्रिक अडचणींमुळे ही सोडत रद्द करण्यात आल्याने दोन लाख १५ हजार अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा वाढली आहे.

सोडतीची नवीन तारीख अद्याप मंडळाकडून जाहिर करण्यात आलेली नाही. एक-दोन दिवसात नवीन तारीख जाहिर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली

Lonavala: लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

पुणे - मुंबई -पुणेची प्रतीक्षा संपली

पुणे मुंबई पुणे रेल्वे प्रवासात आता प्रवासी गाड्यांना मला गाड्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही

कारण मुंबई रेल्वे विभागाने लोणावळा स्थानकाचे यार्ड रिमॉर्टेलींग करताना लोहमार्गाचे विस्तारीकरण केले आहे

सुमारे 150 मीटरने लांबी वाढवली आहे शिवाय दोन नवीन लोक लाईन देखील सुरू केले आहेत

परिणामी लोणावळा स्थानकावरील रेल्वे गाड्यांचे हाताळणी जलद सुरक्षित तर झालीच आहे शिवाय हाताळण्याची क्षमता देखील वाढली आहे.

Pune: पुणे शहरात 4 हजार मतदान केंद्रे

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक 900 मतदारांना एक मतदान केंद्र असणार आहे यानुसार संपूर्ण शहरातील 3946 मतदान केंद्रांची निर्मिती केली जात आहे यासाठी शाळा शासकीय नेम शासकीय इमारती सोसायटीमधील जागांचा शोध सुरू आहे गरज पडल्यास पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.

Parbhani: परभणीमध्ये एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात 10 नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल

राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगारात बसेस क्या ताफ्यात दहा नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल झाल्या आहेत. परभणी विभागाला एकूण ७२ बस मंजूर आहेत पहिल्या टप्प्यात 10 बस ह्या परभणीत दाखवल झाल्या आहेत अतिशय सुरक्षित आणि सुंदर बस परभणीकरणा प्रवास करण्यासाठी 100 टक्के इलेक्ट्रिक आणि इंधन-कार्बन उत्सर्जन कमी असणाऱ्या बस ह्या आहे. बस साठी भव्य असे चार्जिंग स्टेशन परभणीत उभारण्यात आले आहे या इलेक्ट्रिक बसांची सोय प्रवाशांना अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवास देण्यासाठी करण्यात आली आहे

Yavatmal: यवतमाळ पालिकेसाठी प्रचाराचा एक दिवस वाढवला

यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत सातत्याने निवडणूक आयोगांकडून फेरबदल केले जात आहे दिनांक 4 डिसेंबर रोजी जाहीर सुधारित कार्यक्रमानुसार जाहीर प्रचाराची मुदत ही 18 सप्टेंबर रोजी रात्री दहापर्यंत देण्यात आली होती आता पुन्हा त्यातबदल करून 19 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे या कालावधीनंतर मात्र प्रचारावर पूर्णतः बंदी आहे सभा रॅली घेता येणार नाही.

Nagpur: नागपूरच्या कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात ओझोन वायूची गळती

- सात क्रमांकाच्या वीजनिर्मिती युनिटमध्ये दुपारी घटना.

- १८ कामगारांचा श्वास गुदमरला, मात्र अलार्म वाजल्यानं मोठी दुर्घटना टळली, कामगारांना सुरक्षित बाहेर काढले.

- सर्व कामगारांना रुग्णवाहिकेतून मेयो रुग्णालयात दाखल, काही कामगारांना पोट फुगणे आणि श्वसनाचा तीव्र त्रास,

- १३ कामगारांवर उपचारानंतर सायंकाळी सुटी, प्रकृती सुधारली.

- दोन कामगारांची ऑक्सिजन पातळी कमी, अतिदक्षता विभागात उपचार, मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी दिली अधिकृत माहिती.

- वायुगळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रकल्प प्रशासनाकडून तपास सुरू.

Raigad: 28 डिसेंबर रोजी रायगड प्रदक्षिणेचे आयोजन

महाडच्या युथ क्लब या संस्थेने किल्ले रायगड प्रदक्षिणेचे आयोजन केले आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे पाचाड पासून या प्रदक्षिणेला प्रारंभ होणार असून चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, टकमक टोकाच्या खालच्या बाजुकडून भवानी टोकाची दरी मार्गे वाघोली खिंडीतुन हिरकणी वाडी अशी हि प्रदक्षिणा असणार आहे. 14 ते 15 किलो मिटर अंतराच्या या प्रदक्षिणे दरम्यान पर्यटक, शिवप्रमी आणि ट्रेकर्सना किल्ले रायगडाच्या दरी खोऱ्यात लपलेली निसर्ग संपन्न आणि रायगडाच वेगळ रूप पाहण्याची संधी मिळणार असून जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन युथ क्लब संस्थे तर्फे करण्यात आले आहे.

पुण्यातून तीन शहरांमध्ये जाणारी इंडिगो एरलाईन्सची सेवा तात्पुरती थांबवली

पुणे ते वाराणसी, पुणे ते बेंगळुरू आणि पुणे ते गुवाहाटी या तीन विमान सेवा इंडिगो कडून थांबवली

३१ डिसेंबर पर्यंत पुण्याहून गुवाहाटी, वाराणसी, चेन्नई आणि बंगळुरू कडे जाण्यासाठी इंडिगो ची विमान सेवा थांबवली

तिकीट आणि त्याच्या रिफंड बाबत इंडिगो एरलाईन्स कडे चौकशी करण्याचे पुणे विमानतळ प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन

कुठून कुठे जाणारी इंडिगो विमान सेवा रद्द, पाहूया

6E 6884: वाराणसी ते पुणे

6E 497: पुणे ते वाराणसी

6E 6876: बेंगळुरू ते पुणे

6E 6877: पुणे ते बेंगळुरू

6E 746: गुवाहाटी ते पुणे

6E 918: पुणे ते चेन्नई

शहीद जवान समाधान पाष्टे यांच्यावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील बोरखेडी येथील शहीद जवान समाधान पाष्टे यांच्यावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवळपास दिड वर्षाआधी जम्मु काश्मिरातील पुच्छ मध्ये देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना बर्फावरील अपघातातील जवान समाधान प्रभाकर पाष्टे वय २६ वर्षे यांच्या मेंदुला जबर इजा होऊन जखमी झाले होते.त्यांच्यावर पुणे येथिल मिल्ट्री साऊथ कमांड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची 13 डिसेंबरला प्राणज्योत माळवली. त्यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळला होता.

अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग.

नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात चव्हाण समर्थकांचे बॅनर.

विशेष करून खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर भाजपा इच्छुक उमेदवाराने लावले बॅनर.

महापालिकेची आचारसंहिता लागू असताना अशोक चव्हाण यांच्या घरासमोर प्रचाराचे बॅनर.

अशोक चव्हाण समर्थकांकडून आचारसंहिता भंग होत असताना कारवाई नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.