रिसोड : ग्रामीण भागात लग्नासाठी मुली मिळत नसल्याने कोणतीही शहानिशा न करता मध्यस्थामार्फत लावलेल्या लग्नात मुलाची फसवणूक झाल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात उघडकीस आला आहे.
मुख्य म्हणजे बनावट लग्न लावणाऱ्या टोळीने नवरदेवाच्या घरात घुसून चक्क नवरदेवाच्या बापाचे अपहरण केले. छत्रपती संभाजीनगर येथील रश्मी गणेश हेंद्रे (वय १९) या मुलीने बनावट वधू बनून हे लग्न केले होते.
Nagpur Crime: वाटणीवरून थोरल्याने केला धाकट्याचा खून; मोहगाव सावंगी, नाल्यात जळालेल्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह आढळलाआसेगाव पेन येथील खानझोडे परिवाराची फसवणूक केली. वधू बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला जाण्यासाठी अटकाव करण्यात आला. त्यानंतर १४ डिसेंबरच्या रात्री चार चाकी तीन वाहनातून १५ ते १६ जणांच्या टोळक्याने सिने स्टाइल मारहाण केली. आपला पाठलाग करत असल्याच्या संशयाने सदर टोळक्याने सुलतानपूर येथे जाणाऱ्या अनोळखी अर्धांग वायू रुग्णास व त्याच्या नातेवाइकास लोणार मार्गावर मोपजवळ बेदम मारहाण केली. वधूसह चार आरोपींना अटक केली आहे. तालुक्यातील आसेगाव पेण येथील दीपक सीताराम खानझोडे या मुलाला लग्न करता मुलगी पाहिजे असल्यामुळे मोहजा येथील एका व्यक्तीने एका महिलेच्या माध्यमातून लग्न जुळविले.
याबाबत दोन लाख रुपयाची बोलणी झाली. संभाजीनगर येथील रश्मी गणेश हेंद्रे (वय १९) हिचे राधा तुपे या बनावट नावाने दीपक सीताराम खानझोडे यांच्याशी ११ डिसेंबर रोजी लग्न लावून दिले. १३ डिसेंबर रोजी सदर वधूला घेण्यासाठी एक चार चाकी गाडी आली. वधू बनावट असल्याचे व ती कायमची जात असल्याचे वर व त्याच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वधूला जाण्यासाठी अटकाव केला. ती गाडी परत निघून गेली. मुलीला आणून सोडा व मुलाच्या वडिलाला घेऊन जा, असा दम सुद्धा दिला. नंतर सदर टोळके हे तीन वाहनातून लोणारच्या दिशेने निघून गेले.
त्यांच्या मागे हिमायतनगर येथील पांढऱ्या रंगाची गाडी अर्धांग वायू झालेल्या रुग्णाला घेऊन सुलतानपूर कडे जात होती. ही गाडी आपला पाठलाग करत असल्याचा संशय आल्याने त्यांनी ती गाडी अडवून अर्धांगवायू रुग्णासह इतर नातेवाइकांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी घटनास्थळ गाठले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा पाठलाग केला. १५ डिसेंबर रोजी बनावट वधूसह चार आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्या ताब्यातील नवरदेवाच्या वडिलांची सुटका केली. आरोपीना रिसोड येथील न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. या घटनेतील बारा आरोपींचा शोध रिसोड पोलिस घेत आहे.
युनेस्कोच्या वारसा स्थळांत लोहगडाचा शिरपेच ! वरपित्याला उचलून थेट गाडीत टाकले१३ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान तीन वाहनातून तब्बल १५ ते १६ जण नवरदेवाच्या राहत्या घरी आसेगाव येथे आले. ती बनावट वधू त्या ठिकाणी मिळाली नसल्याने त्यांनी त्या ठिकाणी मारहाण करून घरातील साहित्याचे नुकसान केले. वराच्या वडिलांना गाडीत टाकले व थेट मोहजा गाव गाठले. याही ठिकाणी वधू सापडली नाही. त्यांनी त्या ठिकाणीही घरातील वस्तूचे नुकसान करून मारहाण केली. गावातील लोक धावून आले असता त्यांनी त्यांना सज्जड दम दिला. त्यांच्याकडे तीक्ष्ण हत्यारे व शस्त्र असल्यामुळे कोणी पुढे धजावले नाही.