Mahabaleshwar News: महाबळेश्वरातील तब्बल ६२० एकर झाडाणी जमीनप्रकरणी सुनावणी पूर्ण; शासनाच्या कारवाईकडे लक्ष..
esakal December 16, 2025 09:46 PM

सातारा : झाडाणी प्रकरणाची अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासमोर सुरू झालेली सुनावणीची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. आता याबाबतचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली.

MPSC Success Story : साताऱ्यातील कामगाराचा मुलगा बनला 'क्लास वन' अधिकारी; वैभवने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत गाठले यशाचे शिखर !

सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरून उघडकीस आणले होते. त्यानंतर सहा नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्ती झाली.

२६ नोव्हेंबर रोजी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, संगीता चंद्रकांत वळवी, अरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी यांना योग्य कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

थरारक घटना! 'कादवे डोंगरातील कड्यात परप्रांतीय युवक रात्रभर जाेरजाेरत ओरडला, आवाज कुणीच ऐकला नाही, सकाळ झाली अन्..

२६ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीस वळवी आणि कुटुंबीय अनुपस्थित होते, तर तक्रारदार सुशांत मोरे उपस्थित राहिले. त्यानंतर श्री. माने यांनी १५ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले. त्याप्रमाणे आज सुनावणी झाली. दोन्हीकडून आपली बाजू मांडण्यात आली. त्यानंतर श्री. माने यांनी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगून अधिकचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. आता शासन काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.