Nashik Municipal Election : नवीन नाशिक प्रभाग २८: शिंदे गटाच्या प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली; भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी!
esakal December 16, 2025 11:45 AM

नवीन नाशिक: सिडको-अंबड परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये येत्या महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे मोठ्या वेगाने बदलत आहेत. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक नगरसेवक निवडून आला होता. मात्र त्यानंतर घडलेल्या शिंदे गटाच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांनी आपली नाळ नव्या गटाशी जोडली. परिणामी, भाजपमध्येच अनेक इच्छुकांमध्ये तगडी चढाओढ निर्माण झाली.

शुभम पार्क, उपेंद्रनगर, वनश्री कॉलनी, बुरकुले लॉन्स, अंबड गाव असा विस्तृत भाग व्यापणारा हा प्रभाग सिडकोतील नवनगरांना सामावून घेणारा आहे. सुशिक्षित मतदारसंख्या मोठी असूनही प्रभाग अद्याप अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

डीपी रस्त्याचे डांबरीकरण, सीसीटीव्ही बसविणे, पेव्हर ब्लॉक, वीजतारा भूमिगत करणे अशा विविध कामांसाठी नगरसेवकांनी प्रयत्न केले असले तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर समाधानकारक प्रगती झालेली नाही. उद्यानांची दुरवस्था, अभ्यासिकेअभावी विद्यार्थ्याची होणारी अडचण, माउली लॉन्स परिसरात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, उपेंद्रनगरमध्ये पाण्याचा कमी दाब, माणिकनगर रस्त्यावर अनधिकृत भाजी मंडई, उघडी पडलेली चेंबरची झाकणे, औद्योगिक वसाहतीजवळ वाढलेली गुन्हेगारी, अंबड पोलिस ठाण्याचे रखडलेले विभाजन अशा अनेक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत.

त्यामुळे नेमका कौल कोणाला द्यायचा, याबाबत नागरिकही संभ्रमात आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून सुशिक्षित, तरुण आणि तडफदार नेतृत्वाची मागणी वाढली आहे. प्रभाग २९ मध्ये तिकीट न मिळण्याची शक्यता लक्षात घेता काही इच्छुकांनी प्रभाग २८ हा पर्याय म्हणून राखून ठेवला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.

मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी झाली होती. इतर पक्षीय उमेदवारांनीही मते घेतल्याने निकाल चुरशीचा ठरला होता. यंदा हीच परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता दिसते. प्रभागात सुशिक्षित मतदारवर्ग झपाट्याने वाढत असून, युवक-युवती, नागरिक आता विकासकामांबाबत अधिक जागरूक झाले आहेत. यामुळे उमेदवारांकडून अधिक ठोस, परिणामकारक आश्वासने आणि कामांची अपेक्षा वाढली आहे.

यंदाचे इच्छुक

डी. जी. सूर्यवंशी, प्रतिभा पवार, सुवर्णा मटाले, दीपक दातीर, दिलीप दातीर, शरद फडोळ, अमोल (संदीप) पाटील, बाळासाहेब पाटील, शीतल भामरे, संजय भामरे, डॉ. विनय मोगल, डॉ. हर्षा मोगल, डॉ. वैभव महाले, वंदना पाटील, अक्षय पाटील, अविनाश पाटील, साहेबराव दातीर, राजेंद्र फड, अमोल शेळके, सचिन पाटील, मनोज आहेर, भूषण भामरे, माधवी सूर्यवंशी, मकरंद वाघ, सीमा वाघ, सुमित बोराळे, अपर्णा गाजरे, रमेश गाजरे, आदित्य दोंदे.

प्रभागातील समस्या

अंबड- लिंक रोडवरील धोकादायक विजेचे खांब

उपेंद्रनगर, माणिकनगर भागातील पाण्याची समस्या

माउली लॉन्स, कृष्णानगरला अवजड वाहनांची वर्दळ

वाढती गुन्हेगारी, अस्वच्छतेने जागोजागी ढिगारे

उद्यानातील अनेक ग्रीन जिमची दुरवस्था

प्रभागात झालेली विकासकामे

बुरकुले हॉल ते फडोळ मळा डीपी रोड

शुभम पार्क येथील रस्त्यांचे डांबरीकरण

Sangli Development : भाजपला सातत्याने साथ देऊनही सांगलीच्या पदरात काय? मुख्यमंत्री फडणवीसांकडून विकासाच्या घोषणांची प्रतीक्षा

डांबरीकरण

महालक्ष्मीनगर येथील जलकुंभ

माउली लॉन्स परिसरात सीसीटीव्हीचे जाळे

अनेक भागांत वीजतारा भूमिगत

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.