Lionel Messi in India : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी शनिवारीपासून तीन दिवसांच्या भारत दौर्यासाठी दाखल झाला आहे. भारतभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये लिओनेल मेसी भारतात दाखल झाल्यापासून प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तीन दिवसांच्या या भव्य दौर्यात मेसीने कोलकात्यापासून हैदराबाद आणि आता मुंबईपर्यंत भेट दिली असून, त्याचा दौरा नवी दिल्लीमध्ये संपणार आहे.
इन्शुरन्समुळे खेळणार नाहीमेस्सी भारतात येऊन त्याचा फुटबॉल सामना पाहण्याची अपेक्षा असलेल्या चाहत्यांची इच्छा मात्र पूर्ण होणार नाहीये. 38 वर्षीय मेस्सी सध्या भारतात फक्त ‘मीट अँड ग्रीट’ दौऱ्यावर आहे. या तीन दिवसांत त्याचा कोणताही क्लब किंवा आंतरराष्ट्रीय सामना नसल्याने तो पूर्ण सामना खेळणार नाही. या निर्णयामागे ‘इन्शुरन्स’ हा मोठा कारणीभूत घटक असल्याचे सांगितले जाते.
₹8100 कोटींचा विमामीडिया रिपोर्ट्सनुसार, मेसीकडे जगातील सर्वात महागड्या क्रीडा विमा पॉलिसींपैकी एक आहे. त्याच्या डाव्या पायाचा तब्बल 900 दशलक्ष डॉलर्सचा (₹8100 कोटी) विमा उतरवण्यात आला आहे. ही केवळ चर्चेत राहणारी आकडेवारी नसून, करिअरला धोका निर्माण करणाऱ्या दुखापतीपासून संरक्षण देणारी गंभीर आर्थिक सुरक्षितता आहे.
अनधिकृत सामने किंवा प्रदर्शनीय सामन्यांदरम्यान जर गंभीर दुखापत झाली, तर त्याला विमासंरक्षण मिळणार नाही. यात होणारे आर्थिक नुकसान कोट्यवधी डॉलर्समध्ये जाऊ शकते. त्यामुळे इंटर मियामी क्लब किंवा अर्जेंटिना राष्ट्रीय संघासाठी अधिकृतपणे मंजूर नसलेल्या कोणत्याही सामन्यात खेळण्याची परवानगी मेस्सीला नाही.
EPFO Provident Fund : घरबसल्या 1 मिनिटात तपासा आपला PF बॅलन्स! जाणून घ्या EPFO पासबुक पाहण्याचे सोपे, जलद मार्ग आणि नवीन सुविधा प्रदर्शनीय सामन्यांसाठी विमा नाहीइतर काही खेळाडूंच्या करारांमध्ये लवचिकता असते, मात्र मेसीच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये स्पष्ट अट आहे की प्रदर्शनीय किंवा मैत्रीपूर्ण सामने यात कव्हर होत नाहीत. भारतातील या दौऱ्यात खेळताना त्याला दुखापत झाली, तर विम्यातून कोणतीही आर्थिक भरपाई मिळणार नाही. म्हणूनच चाहत्यांच्या अपेक्षांनुसार एखादा मैत्रीपूर्ण सामना किंवा शोकेस मॅच न होता, मेस्सीचे कार्यक्रम ‘मीट अँड ग्रीट’ आणि प्रमोशनल इव्हेंट्सपुरतेच मर्यादित आहेत.
Farmer Schemes : शेतकऱ्यांसाठी सरकारची पेन्शन योजना; दरमहा मिळणार 3000 रुपये! जाणून घ्या अर्ज कसा करायचा? मायकेल जॉर्डनचा 'लव्ह ऑफ द गेम' विमा चर्चेतअमेरिकेचा दिग्गज बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डनच्या करार मेस्सीच्या करारापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. शिकागो बुल्ससोबतच्या त्याच्या करारात ‘लव्ह ऑफ द गेम’ ही विशेष अट होती. या अटीमुळे जॉर्डनला कुठेही, कधीही बास्केटबॉल खेळण्याची मुभा होती आणि त्यासाठी संघाची परवानगी आवश्यक नव्हती. एवढेच नाही, तर अशा खेळांदरम्यान दुखापत झाली तरी त्याला पूर्ण मोबदला मिळण्याची हमी होती.