MHD25B04847
मुंबई : येथे शरद पवार आणि पुलवत चा प्रयोग पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित शरद पवार,प्रा.डॉ. दत्तात्रय काळेल व इतर मान्यवर.
डॉ. ‘शरद पवार आणि पुलोद’ या पुस्तकाचे प्रकाशन
महूद, ता. १५ : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या शरद पवार आणि पुलोद चा प्रयोग या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे आज शुक्रवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रा.काळेल यांनी लिहिलेल्या व ‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, खासदार नीलेश लंके, महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, राज्य उद्योग व व्यापार समूहाचे अध्यक्ष नागेश फाटे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख आदी उपस्थित होते.