- rat१६p९.jpg, rat१६p१४.jpg, rat१६p१५.jpg-
P२५O११०२८, P२५O११००७
पावस ः येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या १२३व्या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झालेले भक्तगण स्वामींच्या नामाचा जयघोष करत मार्गस्थ होताना व दिंडी सोहळ्यातील पालखी.
----
पावसमध्ये स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव उत्साहात
दिंडी सोहळ्यास भक्तांची गर्दी; वक्तृत्व, पाठांतर स्पर्धेत ४५ जणांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद यांचा १२३वा जन्मोत्सव सोहळा गेले सहा दिवस पावस येथील मंदिरात साजरा करण्यात आला. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला म्हणजेच मंगळवारी (ता. १६) स्वामीजींच्या १२३व्या जन्मसोहळ्यानिमित्त पावस येथील अनंत निवास ते समाधी मंदिरादरम्यान दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये स्वामींच्या जयघोष व ओम राम कृष्ण हरी यांचा जयजयकार करत पालखी दिंडी अनंत निवासावरून मार्गस्थ झाली. पावस बसस्थानकमार्गे पालखी मंदिरात आली. यामध्ये जिल्ह्यातून आलेले भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.
पावस येथे जन्मोत्सव सोहळ्याला ११ डिसेंबरपासून सुरुवात झाली. दररोज सकाळी ७ ते १२ या कालावधीत स्वामी स्वरूपानंद यांच्या ग्रंथांचे पठण, रात्री श्री हरिपाठ. ११ ला दुपारी सत्संग श्री. दादा वेदक, १२ला दुपारी संजीवनी गाथा अभंग गायन स्पर्धा अंतिम फेरी झाली. १३ ला भाऊराव देसाई स्मृतीप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. १४ ला रोजी चैत्राली अभ्यंकर व रमण शंकर अभंग गायन झाले. १५ ला स्वामीजींचा तारखेप्रमाणे जन्मोत्सव सायंकाळी श्रेन पावस षण्मासिकाचे प्रकाशन झाले. आज सकाळी दिंडी काढण्यात आली. ही दिंडी अनंत निवास ते श्री स्वामी मंदिर अशी काढण्यात आली. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. त्यानंतर सकाळी आरती झाली. समाधी मंदिरात महाप्रसाद होता. या दरम्यान पुणे येथील मकरंद टिल्लू यांचे हास्ययोगातून आनंदसाधना हा कार्यक्रम झाला. त्यानंतर
अमेया पळणीटकर यांनी कथक नृत्य सादर केले. कल्पेश साखळकर यांनी गीत स्वरूपानंदाय सादर केले. कोल्हापूर येथील, उत्तरेश्वर भजनी मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे भजन केले. जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा, अभंग गायन स्पर्धा झाली. सायंकाळी जन्माचे कीर्तन अवधुतबुवा टाकळीकर यांनी सादर केले. रात्री पुणे येथील ऋषिकेश रानडे व प्राजक्ता रानडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली.
दरम्यान, वक्तृत्व, पाठांतर स्पर्धेमध्ये ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर परीक्षक म्हणून गौरी करमरकर, अनुष्का दिनकर लिंगायत, उदय फडके, श्रीमती पोरे, चैत्राली अणेकर यांनी काम पाहिले होते.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, भाऊराव देसाई स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धेचा निकाल असा ः उच्च प्राथमिक गट खुशी केळकर, आर्ची पाथरे, वल्लरी मुकादम. माध्यमिक गट (८वी ते १०वी) ः मुक्ता जोशी, आर्यन चव्हाण, गायत्री पराडकर. पाठांतर स्पर्धा प्राथमिक गट (१ली ते ४थी )- गौरी गुरव, मुक्ता पळसुलेदेसाई. बालगट (१ ते ५ वर्षे) तीर्था परकर, देवांश पटवर्धन आदी.