11188
देवगड : येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात यश मिळवले.
केळकर महाविद्यालयाचे
‘ढोल नाच’ लोकनृत्य प्रथम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ : राज्य शासन क्रीडा व युवक सेवा संचनालय आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ढोल नाच’ या लोकनृत्य प्रकारास प्रथम क्रमांक मिळाला. त्यांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड झाली आहे. मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
या नृत्यामध्ये साहिल जाधव, शिवमनी पाळेकर, विनित चव्हाण, प्रफुल्ल हजारे, पार्थ नाईकधुरे, साईनील धुरे, अभिषेक शिंदे, तनिष नाईक, साहिल जाधव, योगीराज नार्वेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या नृत्याचे दिग्दर्शन सागर सारंग आणि रोहित माने यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल संस्था पदाधिकारी आणि महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.