11199
झोळंबेत हरिनाम सप्ताह उत्साहात
बांदा, ता. १७ ः झोळंबे (ता. दोडामार्ग) येथील श्री पांडुरंग मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. विठूनामाचा जयघोष करत टाळ, मृदंग, ढोल-ताशांच्या गजरात शेकडो वारकरी, भाविक व ग्रामस्थांनी भव्य दिंडी काढली. मंदिराला प्रदक्षिणा करून आरंभ झालेली ही दिंडी वझे महाराज समाधी मंदिर तसेच निवासस्थातील संत तुकाराम महाराजांच्या प्रासादिक पादुका दर्शन घेऊन परत आली. महाआरतीनंतर सोहळ्याची सांगता झाली. पावणीच्या कार्यक्रमानंतर महाप्रसादास आरंभ झाला. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन तसेच महाप्रसाद लाभ घेतला. या सप्ताहात नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजनी मंडळांचे कार्यक्रम झाले. सोहळ्यात दररोज पहाटे ५ वाजता काकड आरती, महापूजा, सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी महाप्रसाद सायंकाळी ७ वाजता हरिपाठ व दिंडी असे विविध कार्यक्रम झाले.