Latest Marathi News Live Update : नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल
esakal December 18, 2025 05:45 PM
Nagpur Live: नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल

नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल

जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेलआयडी वर मेल आल्याची माहिती

सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात सुरक्षेत वाढ..

Nashik : महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या आजपासून मुलाखती

नाशिक महापालिकेसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार मुलाखती - आजपासून ३ दिवस घेण्यात येणार इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती

Sangameshwar News : संगमेश्वरमध्ये कारचा अपघात,चालकाचा जागीच मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.रस्त्याच्या कडेला संरक्षक म्हणून बांधलेल्या गर्डरवर अपघातग्रस्त ब्रेझा गाडी आदळली आणि तशीच काही फूट पुढे गेल्याने तुटलेला गर्डर गाडीचे इंजिन फोडून मागच्या सीटपर्यंत गेला. त्यात तो चालकाच्या मांडीत घुसल्याने चालक गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि जागीच ठार झाला.

Nanded : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष असेल तर राज्यातील नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी किंग मेकर असेल, अजित दादा लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असे विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. नांदेडच्या धर्माबाद येथे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अमोल मिटकरी यांनी हे विधान केलं आहे. दादा हे मुख्यमंत्री होतील त्याचं कारण दादांना राज्यातील लाडक्या बहिणीचा आशीर्वाद, लाडक्या भावांचा आशीर्वाद,शेतकऱ्यांचा आशीर्वाद,आहे. असे अमोल मिटकरी म्हणाले.

J & K Live :अनंतनागमध्ये सीआरपीएफ जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मट्टन भागात काल रात्री उशिरा गस्त घालत असताना एका सीआरपीएफ जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Paithan Live : पैठणमध्ये नगरपरिषदेच्या उमेदवाराच्या घरासमोर जादुटोण्याचा प्रकार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये नगरपरिषदेच्या उमेदवाराच्या घरासमोर जादुटोण्याचा प्रकार समोर आला आहे.

Ajit Pawar Live : अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात ही बैठक असल्याचे समजते.

Kolhapur News : ‘आप’ आजपासून देणार उमेदवारी अर्ज

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत आपकडून लढण्यास इच्छुक असलेल्यांना गुरुवारपासून (ता. १८) उमेदवारी मागणी अर्ज दिले जाणार आहेत. दोन दिवसानंतर मुलाखती घेण्यात येणार आहेत. आम आदमी पार्टीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. १८ व १९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी मागणी अर्ज दिले जाणार आहेत. २० व २१ डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. उद्यनगरमधील आप कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले.

Actress Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या पबवर नियमभंगाचा गुन्हा दाखल

बंगळूर : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मालकीच्या बंगळूरमधील लक्झरी पबविरुद्ध ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ व्यवसाय चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. दरम्यान, याच ‘बास्टियन’ पबवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकून तपासणी केली. सेंट मार्क्स रोडवरील ‘बास्टियन’ रेस्टॉरंट-पबमध्ये ११ डिसेंबर रोजी नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्याचा आरोप आहे.

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, दिल्लीतील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे आज निधन झाले. दिल्ली येथील निवासस्थानी त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे.

MLA Pradnya Satav : आमदार प्रज्ञा सातव काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता!

कळमनुरी (जि.हिंगोली) : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आज दिवसभर राजकीय वर्तुळात होती. याबाबत प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

Valmik Karad : सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुशील घोडेस्वार यांनी आज फेटाळला. देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराडने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. दोनदा सुनावणी झाल्यानंतर बुधवारी पुन्हा तीन तास सुनावणी पार पडली. वाल्मीक कराडतर्फे यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते, ॲड. संकेत कुलकर्णी, ॲड. सत्यव्रत जोशी यांनी बाजू मांडली. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. त्यांनी आधीचे अनेक मुद्दे खोडून काढले. त्यांना ॲड. सचिन सलगर यांनी सहकार्य केले. फिर्यादीतर्फे नितीन गवारे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. धनंजय पाटील यांनी सहकार्य केले.

Adv Manikrao Kokate Resigns : ॲड. माणिकराव कोकाटे बनले बिनखात्याचे मंत्री, सर्व खाती घेतली काढून

Latest Marathi Live Updates 18 December 2025 : सदनिका गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढून घेण्यात आली असून, आता ते बिनखात्याचे मंत्री बनले आहेत. कोकाटे यांच्याकडील खाती तूर्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुशील घोडेस्वार यांनी फेटाळला. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.