Auqib Nabi Success Story: काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील शीरी या गावाचं नावन आता क्रिकेट जगतात गाजत आहे. येथील औकिब नबी डार, ज्याला लोक प्रेमानं काश्मीर एक्सप्रेस म्हणातात, त्यानं कष्ट, मेहनत आणि धैर्यानं स्वतःचं नाव आयपीएलमध्ये नोंदवलं आहे. प्रत्येकाचं स्वप्न इंडियन प्रीमियर लिगमध्ये खेळणं हे असतं. औकीबने विना कोचिंग, चांगलं मैदान नसताना स्वतःला सिद्ध करून दाखवलं. तो IPL लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सुरुवातीला त्याची बोली किंमत अत्यंत कमी होती. पण सलेक्टर्सनी त्याची कामगिरी पाहिली आणि मग त्याचे नशीब पालटले. ज्या भागात नेहमी गोळीबार ऐकू येतो. दहशतवादी कारवाया सुरु असतात अशा काश्मीरमध्ये औकिब सारखे तरूण वातावरण बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हा बदल विस्मयचकीत करणारा आहे. दहशतवाद, दगडफेकीकडे कधी काळी वळालेला काश्मीरी तरुण पुन्हा मुख्य प्रवाहात येत असल्याचे आणि कर्तृत्व सिद्ध करत असल्याचे औकिबच्या यशावरून सिद्ध होत आहे.
IPL मध्ये 8.4 कोटींची बोली
अबुधाबीतील IPL Mini Auction मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 29 वर्षाच्या या वेगवान गोलंदाजाला 8.4 कोटी रुपयात खरेदी केले आहे. हे वृत्त गावात धडकताच शीरी या त्याच्या गावात आनंदाची लहर पसरली. गावकरी त्याच्या घराबाहेर जमले. कारण ही एका औकिबचा आनंद नव्हता. तर संपूर्ण गावासाठी आनंदाची बातमी होती. काश्मीर दहशतवादी कारवाई आणि येथील तरूण दहशतवादाकडे, दगडफेकीत आढळले असताना हा मोठा बदल म्हणावा लागेल.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात
औकिबचा प्रवास साधा नव्हता. बारामुला आणि करीरी सारख्या ठिकाणी क्रिकेटसाठी कोणत्याही सोयीसुविधा नाही. ना योग्य मैदान, ना नेट्स, ना कोचिंग अशा परिस्थितीशी झगडत औकिबने हा लांबचा पल्ला गाठला आहे. त्याने जिद्दीवर, मेहनतीने ही कामगिरी केली आहे. परिस्थिती बिकट असली की माणूस निखरतो हेच यातून सिद्ध होते. आज या परिसरातील प्रत्येकाच्या तोंडी औकिबचे नाव आहे.
कोण आहे औकिब नबी डार?
लिलाव सुरू झाला तेव्हा औकिब याची मुळ किंमत केवळ 30 लाख रुपये इतकी होती. पण त्याच्या गेल्या काही दिवसातील खेळ पाहिल्यानंतर खरेदीदार प्रभावित झाले. तो केवळ स्विंग बॉलरच नाही. तर यॉर्कर फेकण्यातही त्याचे कसब आहे. त्यामुळेच दिल्ली कॅपिटलने त्याला28 पट जास्त पैसे मोजून खरेदी केले आणि गावकरी आनंदून गेले.