अक्षय खन्नाच्या भावाचे नाव राहुल खन्ना आहे. राहुल खन्ना हा एक अभिनेता आहे. बॉलिवुडमध्ये तो सक्रीय आहे. विशेष म्हणजे तो सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो अपलोड करतो. अक्षय खन्नाच्या धुरंधरमधील कामावर मात्र राहुल खन्नाने विशेष प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याने आपल्या भावाच्या कामाचे कौतुक सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील केलेले नाही.
राहुल खन्ना हा अक्षय खन्नाचा मोठा भाऊ आहे. राहुल हा अक्षयपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. अक्षय खन्नाला बॉलिवुडमध्ये फार मोठे यश मिळालेले आहे. त्याने अनेक प्रकारचे चित्रपट केलेले आहेत. राहुलच्या वाट्याला मात्र म्हणावे तेवढे यश आलेले नाही. राहुल खन्ना नेहमी ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी त्याचे बॉलिवुडमध्ये एक वेगळे नाव आहे. राहुल खूपच हँडसम असून तो त्याच्या यूनिक स्टाईलमुळे ओळखला जातो. तो 53 वर्षांचा आहे.
राहुल खन्नाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 1980 च्या दशकात तो आंतरराष्ट्रीय फॅशन, मॉडेलिंग जगात प्रसिद्ध होता. त्याने युरोप तसेच हॉलिवूडच्या अनेक ब्रँड्ससोबत काम केलेले आहे. त्याने 1999 साली अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याने अर्थ या इंग्रजी चित्रपटात पहिल्यांदा काम केले. त्यानंतर हॉलिवुड बॉलिवुड, लव्ह आजकल यासारख्या काही चित्रपटांतही त्याने काम केले. आज राहुल एक अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे.
परंतु त्याला एक लेखक, कॉलमिस्ट आणि स्टाईल आयकॉन म्हणूनही ओळखले जाते. राहुल नेहमी लाईमलाईटपासून दूर असतो. अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना हे एकमेकांपासून दूर राहतात. दोघांनीही लग्न केलेले नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. राहुल खन्नाने 2023 साली एकदा अक्षय खन्नासोबत एक फोटो पोस्ट केला होता. दोघेही कधीच एकत्र दिसत नाहीत.