भारताचे 1000 रुपये इथिओपियामध्ये किती होतात, किंमत ऐकून बसेल धक्का
Tv9 Marathi December 19, 2025 02:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच इथिओपियाचा दौरा केला, इथिओपियामध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं, इथिओपियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉर्डवरून इथिओपियाला पोहोचताच स्वत: इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली हे विमानतळावर पोहोचले त्यांनी विमानतळ ते हॉटेल प्रवासादरम्यान मोदी यांच्या वाहनाचं सारथ्य केलं. इथिओपियाच्या पंतप्रधानांनी स्वत: वाहन चालवलं, एवढंच नाही तर मोदी जेव्हा आपला इथिओपियाचा दौरा आटपून ओमानला रवाना झाले, तेव्हा देखील त्यांना निरोप देण्यासाठी अबी अहमद अली हे त्यांच्यासोबत विमानतळापर्यंत आले, यावेळी देखील त्यांनी पुन्हा एकदा मोदींच्या वाहनाचं सारथ्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट इथिओपियासाठी अनेक अर्थानं महत्त्वाची होती. दोन्ही नेत्यांमध्ये या भेटीदरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत, की इथिओपियाचे एक हजार रुपये भारतामध्ये किती होतात? आणि त्यामधून आपण काय -काय खरेदी करू शकतो?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इथिओपिया दौऱ्याची चर्चा सध्या संपू्र्ण देशभरात सुरू आहे, इथिओपियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या सर्व पार्श्वभूमीवर अनेकांना आता असा देखील प्रश्न पडला आहे की, इथिओपियामध्ये भारताच्या चलनाची काय किंमत आहे. भारताचे एक हजार रुपये इथिओपियामध्ये किती होतात? इथिओपियामध्ये आपण त्यातून काय -काय खरेदी करू शकतो. याच सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

एक हजार रुपयाची किंमत किती?

इथिओपियामध्ये इथिओपियन बिर्र हे चलन वापरलं जातं. इथिओपियन बिर्र हे रुपयापेक्षा मजबूत आहे. त्यामुळे आपण जेव्हा इथिओपिया फिरण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला तेथील अनेक गोष्टी या महागड्या वाटतात. भारताचे एक हजार रुपये, इथिओपियन बिर्र मध्ये कन्व्हर्ट करायचे झाल्यास आपल्याला फक्त 555 रुपये मिळतात. तसेच इथिओपियामध्ये महागाई जास्त असल्यामुळे तुम्हाला ट्रिपसाठी देखील जास्त खर्च लागू शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.