भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेतील चौथा सामना लखनौमध्ये धुक्यामुळे रद्द झाला.
हा सामना रद्द झाल्यानंतर चाहत्यांना पैसे परत मिळतील.
बीसीसीआयच्या नियमानुसार एकही चेंडू न खेळल्यास तिकीटाचे पैसे परत दिले जातात.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सध्या टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना लखनौमधील एकाना क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी (१८ डिसेंबर) होणार होता. मात्र जवळपास तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे चाहत्यांची मात्र प्रचंड निराशा झाली.
IND vs SA, T20I: भारत-दक्षिण आफ्रिका संघातील लखनौत होणारा चौथा सामना रद्द; कारण घ्या जाणूनया सामन्याला बुधवारी संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार होती, तर त्याआधी ६.३० वाजता नाणेफेक होणार होती. मात्र दुपारी तीन वाजल्यापासून लखनौमध्ये धुक्याची चादर पसरण्यास सुरुवात झाली होती. संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात धुकं असल्याचे समोरच्या गोष्टी दिसण्यास त्रास होत होता.
त्याचमुळे अनेकदा सामनाधिकाऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेतल्यानंतर अखेर रात्री ९.३० वाजता सामना रद्द केला. तीन तास वाट पाहूनही एकाही चेंडूचा खेळ पाहायला न मिळाल्याने चाहते निराश झाले आणि माघारी परतले.
मात्र, यानंतर सर्वांना असा प्रश्न पडला की हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये खर्च केले होते. पण असे असताना त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार की नाही, यासाठीचे नियम काय आहेत? तर ज्यावेळी अशी परिस्थिती उद्भवते, त्यासाठी बीसीसीआयचे नियम आहेत.
बीसीसीआयच्या नियमानुसार जेव्हा एकही चेंडूचा खेळ न होता सामना रद्द होतो, तेव्हा तिकीट बुकींची फी कापून बाकी सर्व पैसे चाहत्यांना परत केले जातात. तसेच सामना सुरू झाल्यानंतर काही षटकांचा खेळ झाल्यावर जर सामना रद्द झाला, तर मात्र चाहत्यांना तिकीटांचे पैसे परत मिळत नाहीत.
आता लखनौमधील सामन्यात नाणेफेकही झाली नाही. त्यामुळे या नियमानुसार सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांचे पैसे वाया जाणार नाहीत. त्यांना त्यांचे पैसे परत केले जातील. पण त्यांना कधीपर्यंत त्यांचे पैसे परत मिळणार, याबाबत राज्य क्रिकेट असोसिएशन आणि तिकीट पार्टनर यांच्याकडून लवकरच माहिती देण्यात येईल.
IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर पाचवा सामना निर्णायकचौथा टी२० सामना रद्द झाल्यानंतर आता पाचवा टी२० सामना निर्णयक ठरणार आहे. सध्या या मालिकेत भारतीय संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आता पाचवा सामना भारताने जिंकला, तर मालिकाही ते जिंकतील. तसेच दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी पाचव्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.