Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना हाय कोर्टाचा मोठा दिलासा, जामीन मंजूर
GH News December 19, 2025 08:12 PM

नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं, त्याविरोधात कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती, दरम्यान या प्रकरणावर सुनावणी करताना हाय कोर्टानं मोठा निर्णय घेतला आहे. माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना एक लाखाच्या जातमुचलक्यावर हाय कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे तुर्तास तरी माणिकराव कोकाटे यांची अटक आता ठळली आहे. नाशिकमधील सदनिका प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं. अटक वॉरंट जारी होताच माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, आता या प्रकरणात त्यांना हाय कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नाशिक सदनिका प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, हे प्रकरण 1995 सालचं आहे. दरम्यान त्यानंतर याच प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं, अटक वॉरंट जारी होताच माणिकराव कोकाटे यांची तब्येत बिघडली, त्यांना उपचाराठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोकाटे यांनी याविरोधात हाय कोर्टात धाव घेतली होती.

परंतु या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यात हाय कोर्टानं नकार दिला होता, शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी घेण्याची तयारी हाय कोर्टाकडून दाखवण्यात आली होती, त्यानुसार आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली. या प्रकरणात कोकाटने यांना हाय कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हाय कोर्टानं कोकाटे यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर  जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता तुर्तास तरी कोकाटे यांची अटक टळली आहे.  मात्र कोर्टाकडून माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाहीये. कोकाटे यांना जामीन मंजूर झाल्यामुळे सध्या तरी आता त्यांना अटक होणार नाहीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.