बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी नोकरी सोडून अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला, पण हा प्रवास त्यांच्यासाठी फार सोपा नव्हता… असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीने देखील केलं आहे. आर्मीमधील नोकरी सोडून तिने बॉलिवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला.. पण अभिनेत्रीचा प्रवास सोपा नव्हता… बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी अभिनेत्रीला बारमध्ये काम करावं लागलं. लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत डान्स करावा लागला.. या मायानगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक लोक येत असतात. पण सर्वांचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. पहिला सिनेमा मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लगते, पण त्यापेक्षा देखील कठीण इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम करणं सर्वात मोठं अव्हान असतं…
अनेक संकटांता सामना करत अभिनेत्री माही गिल हिने देखील स्वतःची ओळख इंडस्ट्रीमध्ये भक्कम केली. अभिनयाचे स्वप्न पाहणाऱ्या माही हिने मुंबईत एन्ट्री केली… सिनेमात काम मिळणं हे माहीसाठी एक चमत्कार होता… कारण ज्या परिस्थितीत अभिनेत्रीला काम मिळालं, त्याबद्दल तिने कधी विचार देखील केला नसेल…
डान्स केल्यामुळे माही हिला सिनेमात काम मिळालं… याबद्दल अभिनेत्रीने कपिल शर्मा शोमध्ये मोठा खुलासा केलेला… माही सलग 1 वर्ष डिस्कोमध्ये जात राहिली… कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना अभिनेत्री म्हणाली, मी खूप मित्र बनवले होते आणि मला वाटलं की कोणीतरी मला पेट्रोल पंपावर किंवा डिस्कोवर पाहून त्याच्या सिनेमात साइन करेल, पण तसं झालं नाही.
पुढे माही म्हणाली, ‘एका लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत मी डान्स करत असताना, पहिल्यांदा अनुकाग कश्यप यांनी मला पाहिलं… मी सलग 5 – 6 तास डान्स करत होती…’ तेव्हा अनुराग कश्यप यांनी अभिनेत्रीला ‘देव डी’ सिनेमात काम करण्याता सल्ला दिला… सिनेमात माही हिने पारो ही भूमिका साकारली होती… तेव्हा अभिनेत्रीला फिल्मफेयर बेस्ट एक्ट्रेस या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं… त्यानंतर माही हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही..
पंजाबी सिनेविश्वात पदार्पण करण्यापूर्वी माही इंडियन आर्मीचा एक भाग होती… मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी अभिनेत्रीने नोकरी सोडली… माही हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाआधी अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला. सध्या माही गोवा याठिकाणी बॉयफ्रेंड आणि लेकीसोबत राहते… 2023 मध्ये अभिनेत्रीने सर्वांसमोर नात्याची घोषणा केली… माही सोशल मीडियावर कामय मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.