Marathi Serial: तेजश्री प्रधान आणि रेश्मा शिंदेच्या मालिकेत रंगली स्पर्धा; कोणती मालिका ठरली प्रेक्षकांची फेव्हरेट? पाहा TRP यादी
Saam TV December 19, 2025 09:45 PM

Marathi Serial: मराठी टीव्ही मालिकांचा नवीन टीआरपी अहवाल जाहीर झाला असून यात गेल्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी मारली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेला ५.३ रेटिंग मिळाल्यामुळे त्या यादीतील पहिल्या क्रमांकावर कायम राहण्यात यश मिळाले आहे. तर आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेतील ‘नशीबवान’ मालिका ४.८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

गेल्या आठवड्यात ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेने अखेरचा भाग प्रदर्शित केला आणि ४.७ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर गाठला आहे. तर ‘तू ही रे माझा मितवा’ ही कथा ४.४ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे.

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

टीआरपीच्या टॉप-५ यादीत यावेळी झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ मालिकेने ४.१ रेटिंगसह स्थान मिळवलं आहे. ही मालिकेला पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये आल्यामुळे विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. ‘कमळी’ मालिकेने झी मराठीवर सर्वाधिक रेटिंग मिळवणारी मालिका म्हणून नंबर १ स्थान मिळवलं आहे.

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

इतर मालिकांमध्ये ‘घरोघरी मातीच्या चुली’ (३.८) सहावी आणि ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (३.७) सातवी क्रमांकावर आहेत. या दोन्ही मालिकेत मोठी चुरस पहायला मिळत आहे. याशिवाय ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘तारिणी’, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सुमारे ३.५ रेटिंगने आठव्या क्रमांकावर आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ आणि ‘देवमाणूस’ यांनी अनुक्रमे ९वे आणि १०वे स्थान मिळवलं आहे.

View this post on Instagram